अकलूजची महाविकास आघाडी सरकारला एवढी भीती का वाटते?

महाविकास आघाडी सरकारकडून नातेपुते व अकलूजकरांच्या विकासाच्या मार्गात का अडथळे आणले जात आहेत?
Dhairyasheel  Mohite Patil criticizes the Mahavikas Aghadi government over the decision of the Municipal Counci
Dhairyasheel  Mohite Patil criticizes the Mahavikas Aghadi government over the decision of the Municipal Counci

नातेपुते  (जि. सोलापूर) : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार माळशिरस तालुक्यातील अकलूज आणि नातेपुते ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये मुद्दामहून करत नाही. हे राज्य सरकार या दोन गावांना जाणीवपूर्वक अशी दुजाभावाची वागणूक देत आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला. 

पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीमध्ये करण्यात आल्याचे परिपत्रक राज्य सरकारने नुकतेच जाहीर केले आहे. त्यानंतरही अकलूजचे नगरपरिषदेमध्ये, तर नातेपुत्याचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये होणे बाकी आहे. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर वरील आरोप केला.

धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, बारामती तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचे परिपत्रक राज्य सरकारने ३० मार्च रोजी काढले आहे. मात्र, माळशिरस तालुक्यातील अंतिम टप्प्यात असलेल्या अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतींचे नगरपरिषदेत रुपांतरीत करण्याबाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. राज्य सरकार या नगरपरिषदेबाबत परिपत्रक का काढत नाही? हा दुजाभाव का? असे प्रश्न मोहिते पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

नगरपरिषद होण्यासाठी नातेपुते व अकलूज येथील जनतेने जीवाचे रान केले आहे. या दोन ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर होणे शेवटच्या टप्प्यात आहे. फक्त राज्य सरकारकडून याबाबतचे परिपत्रक काढणे बाकी असताना माळशिरस तालुक्यातील जनतेबाबत राज्य सरकारला एवढा आकस व टोकाचा द्वेष का वाटावा? महाविकास आघाडी सरकारकडून नातेपुते व अकलूजकरांच्या विकासाच्या मार्गात का अडथळे आणले जात आहेत? कशाची भीती वाटते सरकारला? या गावातील नागरिकांचा दोष काय? का राज्य सरकार या दोन नगरपरिषदांबाबत परिपत्रक काढत नाही?, असे सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते मोहिते पाटील यांनी विचारले.

राज्य सरकारने कोणताही दुजाभाव न करता सर्व समावेशक भूमिका घ्यावी. माळेगावप्रमाणेच माळशिरस तालुक्यातील अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपरिषदमध्ये तत्काळ रूपांतर करावे, अशी मागणीही धैर्यशील मोहिते पाटील यांनी शेवटी केली आहे.

बारामती तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीतमध्ये रूपांतर करण्याचे नोटिफीकेशन राज्य सरकारने काढल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत थेट राज्य सरकारवर हल्लाबोल चढविला आहे. त्यामुळे राज्य सरकार आता अकलूज, नातेपुत्याबाबत काय निर्णय घेणार, याकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com