गृहमंत्र्यांच्या आंबेगावला रेमडेसिव्हिरमध्ये झुकते माप का : शिवसेना नेत्याचा सवाल

माजी आमदार सोनवणे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनापत्र लिहिले आहे.
Despite the low number of corona patients, why Ambegaon is given extra remdesivir injections
Despite the low number of corona patients, why Ambegaon is given extra remdesivir injections

आळेफाटा (जि. पुणे) :  जुन्नर तालुक्यात कोरोनाचे रूग्ण जास्त असतानाही तालुक्यास रेमडेसिव्हिरची इंजेक्शन मात्र खूपच कमी मिळाली आहेत. त्या तुलनेत गृहमंत्र्यांचा  तालुका असलेल्या आंबेगावात रुग्णांची संख्या कमी असूनही त्यांना जादा इंजेक्शन देण्यात आली आहेत, अशी तक्रार माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी केली आहे. जुन्नरला तातडीने रेमडेसिव्हिरची इंजेक्शन वाढवून द्यावीत, अशी मागणी करणारे पत्र माजी आमदार सोनवणे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांना लिहिले आहे.

दरम्यान, याबाबत आमदार अतुल बेनके यांनी सांगितले की, जुन्नर तालुक्यात रेमडेसिव्हिरचा पुरवठा जास्त मिळण्यासाठी पालकमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासन विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे.

जुन्नर तालुक्यात सरकारी मान्यतेचे २० कोव्हिड सेंटर सुरू आहेत. कोरोना रुग्णांची संख्या तालुक्यात दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. असे असूनही तालुक्यास रेमडेसिव्हिरची केवळ ९० इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तालुक्यातील सध्याची रुग्णसंख्या आणि रुग्णवाढीचा वेग पाहता ती इंजेक्शन्स अत्यंत तुटपुंजी आहेत. ता तुलनेत शेजारच्या गृहमंत्र्यांच्या आंबेगाव तालुक्यात कमी रूग्ण संख्या आहे. त्या ठिकाणी केवळ ६ कोव्हिड सेंटर असूनसुद्धा त्या तालुक्यास रेमडेसिव्हिरची २५० इंजेक्शन दिली आहेत.

जुन्नरमध्ये २० कोव्हिड सेंटर आणि रुग्णसंख्या जादा असूनही रेमडेसिव्हिरची फक्त ९० च इंजेक्शन का, असा प्रश्न त्यांनी पत्रातून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांना विचारला आहे. तसेच, रेमडेसिव्हिरची इंजेक्शन जुन्नरला तातडीने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. 


जुन्नर तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली असून प्रत्येकाने आपापली काळजी घेतली पाहिजे. कोरोनाच्या रुग्णांसाठी जे रेमडेसिव्हिचे इंजेक्शन लागते, ते डाॅक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना आणायला सांगत होते. ते इंजेक्शन आता डाॅक्टरानींच आणावे, असे सांगण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत उपाय योजना करण्यासाठी जुन्नर तालुक्याला चार ते कोटी रूपयांचा निधी दिलेला आहे. तसेच, जुन्नर तालुक्यात रेमडेसिव्हिरचा पुरवठा जास्त मिळण्यासाठी पालकमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासन विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. -अतुल बेनके, आमदार, जुन्नर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com