...तर पुण्यात पुन्हा कडक निर्बंध; अजित पवार

आंदोलनाला आमचा विरोध नाही. लोकशाहीत कोणीही आपल्या हक्कांसाठी आंदोलन करू शकतो. मात्र, सध्या ती परिस्थिती नाही. तरीही कोरोना संसर्ग होणार नाही.
 Ajit Pawar .jpg
Ajit Pawar .jpg

मांजरी : मराठा, ओबीसी आरक्षण आणि पदोन्नती बाबत विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे. मुळात सत्तेतील तीन पक्षाचे सरकार कधी पडेल यावरच केवळ त्यांचे लक्ष आहे. संधी साधून सरकार कसे पडेल, याचीच संधी विरोधक वारंवार पाहत आहेत. सरकारवर काहीच फरक पडत नाही हे विरोधकांच्या चांगलच लक्षात येऊनही त्यांची पोटदुखी मात्र थांबत नाही, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांना लगावला आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar criticizes the Opposition)

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री पवार मांजरी बुद्रुक येथे आले होते. दुपारी बैठक संपल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, "काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेऊन हे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे या तिघांचाही पाठिंबा असेपर्यंत महाविकास आघाडीला धोका नाही.' 

बुधवारच्या मराठा आरक्षण (Maratha reservation) आंदोलन विषयी बोलताना पवार म्हणाले, "आम्ही खासदार संभाजीराजे छत्रपती यांना आंदोलना ऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आवाहन केले होते. परंतु, ते इतके पुढे गेलेत की आता आंदोलन थांबवता येणार नाही असेच दिसते. आंदोलनाला आमचा विरोध नाही. लोकशाहीत कोणीही आपल्या हक्कांसाठी आंदोलन करू शकतो. मात्र, सध्या ती परिस्थिती नाही. तरीही कोरोना संसर्ग होणार नाही

याची खबरदारी घेऊन हे आंदोलन व्हावे,' असे आवाहन अजित पवार यांनी केले. मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही नुकतीच पंतप्रधान आणि राज्यपाल यांची भेट घेऊन सरकारची भूमिका सांगितलेली आहे. 

दरम्यान, कोल्हापुरातून सुरू होणाऱ्या बुधवारच्या माराठा आंदोलनाला मंत्रिमंडळातील गृहराज्यमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे भेट देतील. त्यावेळी ते आंदोनकर्त्यांची भूमिका जाणून घेतील तसेच, ते राज्य सरकारचीही याबाबतची भूमिका स्पष्ट करतील, अशी माहितीही यावेळी अजित पवार यांनी दिली. 

अनलॉक बाबत पवार म्हणाले, "गेली काही महिने लॉकडाऊन मुळे हातावर पोट असणारे, छोटे- मोठे व्यावसायीक अडचणीत सापडले आहेत. त्यांना काही प्रमाणात मदत होते आहे. या परिस्थितीत अनलॉक करणे गरजेचे होते. कोरोना पॉझिटीव्ह रेट कमी झाल्याने पुण्यात अनलॉक करुन काही बाबतीतचे निर्णय शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, हा रेट पाच टक्के किंवा त्यापेक्षा अधिक झाल्यास पुन्हा पुण्यातही कडक निर्बंध घालण्यात येतील.

उर्वरित गावे पालिकेत समाविष्ट करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी जो आवश्यक वेळ द्यावा लागतो आहे, तोच दिला जातो आहे. सध्या ही गावे पीएमआरडीए कडे आहेत. या गावांचा डीपीही तयार झाला असून लवकरच ही गावे पालिकेत समाविष्ट करण्यात येतील,' असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.   
Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com