खासदार कोल्हेंच्या भावाकडून आढळरावांबाबत सोशल मीडियात शिवराळ भाषेत पोस्ट : गुन्हा दाखल 

याबाबत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.
Defamatory post on social media about former MP Adhalrao Patil from MP Kolhe's brother: Crime filed
Defamatory post on social media about former MP Adhalrao Patil from MP Kolhe's brother: Crime filed

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे जुन्नर तालुक्‍यातील नारायणगाव येथील बंधू सागर रामसिंग कोल्हे यांनी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याबद्दल अत्यंत शिवराळ भाषेत आपल्या फेसबुक पेजवरून टीका टिप्पणी केली. आढळराव यांची सोशल मीडियावर होत असलेली ही बदनामी बुधवारी (ता. 10 मार्च) रात्री साडेनऊच्या सुमारास शिवसैनिकांच्या लक्षात आली. त्यानंतर ज्येष्ठ शिवसैनिक तथा मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सागर कोल्हे यांच्या विरोधात मंचर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. 

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड लोहमार्गास राज्याच्या अर्थसंकल्पात नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यावरून खासदार डॉ. कोल्हे आणि माजी खासदार आढळराव पाटील यांच्यात श्रेयवाद रंगला आहे. त्यावरूनच खासदारांचे बंधू सागर कोल्हे यांनी आढळराव यांच्यावर सोशल मीडियावरून टीका केली आहे. 

सागर कोल्हे यांनी त्यात माजी खासदार तथा शिवसेना उपनेते आढळराव यांचा एकेरी भाषेत उल्लेख करीत टीका केली आहे. "नको ते श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात...मग एअरपोर्टला काय प्रॉब्लेम होता?' "फुकटराव श्रेय लाटतात...आगीनगाडीचे स्वप्न पाहतात.'  'लबाड लांडगं ढोंग करतंय...शिवसेनेशी इमानदारीचं सोंग करतंय', "एक होते ढळराव, त्यांनी 15 वर्षे काहीच नाही केलं राव!,' अशा पद्धतीच्या बदनामीकारक पोस्ट सागर कोल्हे यांच्याकडून व्हायरल करण्यात आल्या आहेत. 

याबाबत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. शिवाय सोशल मीडियावरही याप्रकरणी आक्षेप नोंदविले आहेत. शेवटी बुधवारी (ता. 10 मार्च) रात्री दहाच्या सुमारास मंचरचे ज्येष्ठ शिवसैनिक व माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी मंचर पोलिस स्टेशन गाठले व पोलिस निरीक्षक सुधारक कोरे यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. त्यानुसार सागर कोल्हे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. त्यावरून मंचर पोलिसांकडे सागर कोल्हे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर सेलकडे हे प्रकरण पाठविण्यात आल्याचे मंचर पोलिसांकडून सांगण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com