गोपीचंद पडळकरांच्या बदनामीबद्दल बारामतीत तक्रार दाखल... - Defamation Complaint Registered in Baramati For Defamation of Gopichand Padalkar | Politics Marathi News - Sarkarnama

गोपीचंद पडळकरांच्या बदनामीबद्दल बारामतीत तक्रार दाखल...

मिलिंद संगई
गुरुवार, 8 एप्रिल 2021

धनगर समाज व आमदार गोपीचंद पडळकर यांची अत्यंत अश्लिल शब्दात बदनामी केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसात आज तक्रार दाखल करण्यात आली. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हा निरीक्षक डॉ अर्चना पाटील यांनी तक्रार दिली.

बारामती : धनगर समाज व आमदार गोपीचंद पडळकर यांची अत्यंत अश्लिल शब्दात बदनामी केल्याप्रकरणी बारामती Baramait शहर पोलिसात Police आज तक्रार दाखल करण्यात आली. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या NCP सातारा जिल्हा निरीक्षक डॉ अर्चना पाटील यांनी तक्रार दिली. Defamation Complaint Registered in Baramati For Defamation of Gopichand Padalkar

या बाबतच्या तक्रारीवर बापुराव सोलनकर, संपतराव टकले, सुधाकर पांढरे,  वसंत घुले, नवनाथ मलगुंडे यांच्या सह्या आहेत. यात असे नमूद करण्यात आले आहे की, शशांक तुकाराम मराठे याने  (प्लॉट नंबर 28 टी/7 व अंगणवाडी रोड 12 गोवंडी रोड, शिवाजीनगर मुंबई महाराष्ट्र ) शशा मराठे या फेसबुक  नावाने फेसबुक अकाउंट वरून धनगर समाजाची Dhangar Community व आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांच्या वर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अश्लिल शब्दात लिखाण केले आहे त्यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

अशा विकृत व्यक्तींकडून नेहमीच महापुरुष व जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणा-या पोस्ट टाकल्या जातात,  अशा विकृत बुध्दीच्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे.   राजर्षी शाहू महाराज , महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडतात  हे अतिशय दुर्दैवी आहे, असे डाॅ. अर्चना पाटील यांनी म्हटले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना ही निवेदन पाठवणार असल्याचे डॉ अर्चना पाटील यांनी यावेळी सांगितले.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख