राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदेंच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याचा कोर्टाचा आदेश

कारखान्यास आधार कार्ड, पॅनकार्ड, बँकेचे पासबुक आदी कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति देण्यात आल्या होत्या.
Court orders filing of case against NCP MLA Babandada Shinde's son
Court orders filing of case against NCP MLA Babandada Shinde's son

बार्शी  (जि. सोलापूर) : बार्शी तालुक्यातील तुर्कपिंपरी येथील बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह बबनराव शिदे यांनी बँकेच्या शाखाधिकाऱ्यांशी संगनमत करुन शेतकऱ्याच्या नावावर परस्पर दोन लाखांचे कर्ज उचलले. या प्रकरणी आमदार शिंदे यांच पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यासह तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश बार्शीचे न्यायदंडाधिकारी आर. एस. धडके यांनी ९ एप्रिल रोजी बार्शी शहर पोलिसांना दिले आहेत.

आमदार पुत्र रणजितसिंह बबनराव शिंदे, तत्कालीन शाखाधिकारी, एक त्रयस्थ व्यक्ती यांच्यावर फसवणुकीचा, बनावट कागदपत्रे तयार करणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पांडुरंग मधुकर थोरबोले (रा. काळेगाव, ता. बार्शी) यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. 

महात्मा गांधी विद्यालय चोरढे (ता. मरुड  जि. रायगड) येथे शिक्षक असणारे पांडुरंग थोरबोले यांची काळेगाव येथे जमीन गट क्रमांक २८४/१ असून त्यांनी बँक ऑफ इंडिया शाखा पानगाव येथे जमीन गहाण-तारण ठेवून कर्ज काढले होते. बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्याचे सभासद होताना कारखान्यास आधार कार्ड, पॅनकार्ड, बँकेचे पासबुक आदी कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति देण्यात आल्या होत्या.
   
या कागदपत्रांचा फायदा घेऊन रणजितसिंह शिंदे, शाखाधिकारी व एक व्यक्ती समक्ष उभा करुन त्यांनी संगनमत करुन पूर्वीचे माझे नावावर कर्ज असतानाही बँक ऑफ इंडियाच्या, बार्शी शाखेतून माझ्या परस्पर माझ्या बनावट सह्या करून २८ डिसेंबर २०१६ रोजी २ लाख कर्ज माझे नावावर घेतले आहे.  बँक ऑफ इंडियाचे अॅड. श्रेयस मुळे यांची व्याजासह कर्ज वसुलीसाठी ५ सप्टेंबर २०१९ रोजी २ लाख ५६ हजार १८७ रुपये ७४ पैसे भरण्याची नोटीस आली, तेव्हा परस्पर माझ्या नावावर कर्ज काढल्याचे समजले.

याबाबत बँकेच्या बार्शी शाखेत माहिती घेऊन पोलिस अधिक्षक, उपअधिक्षक, पोलिस निरीक्षक यांच्याकडे फसवणुकीची तक्रार केली. पण, दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केला, असे थोरबोले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. थोरबोले यांच्या वतीने अॅड. आर. यू. वैद्य, अॅड. के. पी. राऊत, अॅड. श्रीमती पी. एस. शहा काम पाहत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com