सत्तेसाठी सैरभैर झालेला भाजप ईडी, सीबीआयचा गैरवापर करते!

महाविकास आघाडी सरकारला या सर्वाचा वापर करून बदनाम कसे करता येईल हा त्या पाठीमागचा उद्देश आहे.
 Vijay Vadettiwar .jpg
Vijay Vadettiwar .jpg

इंदापूर : केंद्रातील भाजप (BJP) सरकार हे व्यापाऱ्यांचे सरकार असून त्यांना शेतकऱ्यांचे काहीही देणे घेणे नाही. पाच वर्षांत भाजपचे अनेक मंत्री व नेत्यांवर आरोप झाले. मात्र, कोणाचीही ईडीकडून किंवा सीबीआय कडून चौकशी झाली नाही. मात्र, महाविकास आघाडीच्या विरोधात भाजप सूडाचे राजकारण करत आहे. असा आरोप मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vattediwar) यांनी केला. (Congress leader Vijay Vadettiwar criticizes BJP) 
 
इंदापूर शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रामवडकुते, इंदापूर काँग्रेस तालुकाध्यक्ष स्वप्रिल सावंत, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, किसानसेलचे तालुकाध्यक्ष डॉ. संतोष होगले, बीएमपीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे, प्रा. कृष्णा ताटे, भगवान फासगे, संतोष आरडे तुषार शेळके, महादेव लोंढे, श्रीनिवास पाटील, आकाश पवार, युवराज गायकवाड, विपुल भिलारे, राहुल जाधव, राहुल वीर, रमेश शिंदे, भगवान कोळेकर उपस्थित होते. 

वडेट्टीवार म्हणाले, सत्ता गेल्यानंतर भाजप सैरभैर झाला असून सत्तेत पुन्हा येण्यासाठी ईडी, सीबीआय किंवा इन्कमटॅक्सचा गैरवापर केला जातो. महाविकास आघाडी सरकारला या सर्वाचा वापर करून बदनाम कसे करता येईल हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. भविष्यासाठी हे सर्वांसाठीच घातक आहे. कारण सत्तेचा मुकुटमणी आयुष्यासाठी घालून येत नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते मात्र विरोधी बाकावर बसलेली भाजप ही खुर्चीसाठी भांडते हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे, असी टीका वडेट्टीवार यांनी केली.

दरम्यान, इंदापूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून आगामी विधानसभेची जागा काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष हा काँग्रेस असेल, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com