'त्या' ७१ सरपंचांबाबत होणार उद्या निर्णय

तब्बल ७१ सरपंचांना निवडीपासून काही दिवस दूर ठेवायला लावणा-या शिक्रापूर सरपंच निवडीच्या आक्षेपावर आता जिल्हाधिकारी गुरुवारी (ता.११) सुनावणी घेणार असून शिक्रापूरकरांची बाजु ऐकून घेतल्यानंतरच ता.१६ पर्यंत जिल्हाधिकारी शिक्रापूरसह तालुक्यातील सर्व ७१ सरपंच निवड प्रक्रीयेची तारीख जाहिर करतील.
Collector to decide fate of Shirur Taluka Sarpanch's
Collector to decide fate of Shirur Taluka Sarpanch's

शिक्रापूर : तब्बल ७१ सरपंचांना निवडीपासून काही दिवस दूर ठेवायला लावणा-या शिक्रापूर सरपंच निवडीच्या आक्षेपावर आता जिल्हाधिकारी गुरुवारी (ता.११) सुनावणी घेणार असून शिक्रापूरकरांची बाजु ऐकून घेतल्यानंतरच ता.१६ पर्यंत जिल्हाधिकारी शिक्रापूरसह तालुक्यातील सर्व ७१ सरपंच निवड प्रक्रीयेची तारीख जाहिर करतील.

शिक्रापूर सरपंच आरक्षणावरील आक्षेपामुळे संपूर्ण शिरुर तालुक्यातील ७१ सरपंच निवड प्रक्रीया स्थगित करण्यात आली असून उच्च न्यायालयाने जिल्हाधिका-यांना काल (ता.०८) दिलेल्या आदेशानुसार वरील निर्णय झाला. दरम्यान अनुसुचित जाती-जमातीच्या आरक्षणावर शिक्रापूरातील रमेश थोरात व अन्य दोन नवनिर्वाचित सदस्यांना आक्षेप घेतल्याने तक्रारदारांची बाजु आता जिल्हाधिकारी गुरुवारी (ता.११) ऐकून घेवून शिक्रापूरसह इतर सर्व ७१ ग्रामपंचायतीच्या सरपंच निवड प्रक्रीयेचे आदेश जारी करतील.  

शिक्रापूर (ता.शिरूर) ग्रामपंचायतीत बांदल गटाचे ७ तर विरोधी शिक्रापूर ग्रामविकास आघाडीचे माजी सरपंच बापूसाहेब जकाते, आबासाहेब करंजे, आबाराजे मांढरे-पाटील, बाबासाहेब सासवडे, सोमनाथ भुजबळ यांच्या गटाचे ९ सदस्य निवडून आले. मात्र सरपंच बांदल गटाचे रमेश गडदे हे एकमेव सरपंच आरक्षणाचे सदस्य ठरले व तेच सरपंच होतील याची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली होती. याच पार्श्वभूमिवर नवर्निवाचित सदस्य रमेश राघोबा थोरात, पुजा दिपक भुजबळ व मोहिनी संतोष मांढरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आरक्षण निश्चितीनंतर याचिका दाखल केली व त्यावर काल मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला. 

निर्णयानुसार शिक्रापूरातील सर्व याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकल्याशिवाय शिक्रापूर सरपंच निवड होणार नाही. पर्यायाने तालुक्यातील सर्व सरपंच निवडी ज्या ९ व १० तारखेला होत्या त्याही शिक्रापूरच्या निर्णयामुळे स्थगित झाल्या व तसा आदेशही काल (ता.०८) रात्री उशिरा जिल्हाधिका-यांनी काढला. दरम्यान या प्रकारणामुळे तालुक्यातील इतर ७० गावांतून प्रशासकीय यंत्रणेबाबत मोठे आक्षेप नोंदविण्यात आले असून अशा पध्दतीने एका गावासाठी अन्य गावांना वेठीला धरण्याचा प्रकार खुपच गंभीर असल्याची प्रतिक्रिया राष्ट्र्वादीचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव ढेरंगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख पोपट शेलार व भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके यांनी दिली.        

निकाल तेंव्हाच लागेल
शिक्रापूर आरक्षणाच्या अन्यायावरुन आज रमेश थोरात व इतर याचिकाकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपले म्हणणे ऐकून घ्यावे यासाठीचा विनंती अर्ज जिल्हाधिका-यांकडे आज दाखल झाला. त्यानुसार तक्रारकर्त्यांचे म्हणजे गुरुवारी (ता.११) ऐकून घेतले जाणार असून त्यानंतरच शिक्रापूर व संपूर्ण शिरुरमधील ७१ सरपंच निवड प्रक्रीयेचे आदेश जिल्हाधिकारी देणार आहेत. दरम्यान शिक्रापूरचे सरपंच प्रकरणाचा निकालावरच शिरुरच्या इतर सरपंच निवड प्रक्रीया ठरणार हे नक्की झाले आहे.

आरक्षण बदललल्यावरही संभ्रम कायम राहणार...?
शिक्रापूरच्या अनुसुचित जाती-जमातीच्या सरपंच आरक्षणावर जिल्हाधिकारी गुरुवरी काय निर्णय घेतात याची उत्सूकता आहे. कारण हे आरक्षण रद्द करावयाचे झाल्यास ते तालुक्यातील अन्य कुठल्या ग्रामपंचायतीवर टाकणार?, बदललेल्या आरक्षणानंतर मुळ आरक्षणाने सरपंच होणारे रमेश गडदे यांनी पुन्हा न्यायालयाची दारे ठोठावल्यावर ही प्रक्रीया पुन्हा न्यायालयीन प्रक्रीयेत अडकू शकते. अर्थात शिक्रापूरच्या एका प्रकरणामुळे संपूर्ण शिरुर तालुक्यातील अन्य ७० ग्रामपंचायतीचे सरपंच निवड प्रक्रीया सध्या दोलायमान स्थितीत आहे हे मात्र नक्की.  
Edited by - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com