राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्याविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल

या प्रकारात तीन जणांना किरकोळ मार लागला आहे.
A case has been registered against a NCP Zilla Parishad member for beating
A case has been registered against a NCP Zilla Parishad member for beating

शिरूर (जि. पुणे) : जमिनी मालकीच्या जुन्या वादावरून सोमवारी (ता. ५ एप्रिल) सकाळी शिरूर तालुक्यातील करडे येथे दोन गटांत हाणामारीचा प्रकार घडला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र जगदाळे यांच्याविरूद्ध बेकायदा जमाव जमवून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारात तीन जणांना किरकोळ मार लागला. जगदाळे यांच्या फिर्यादीवरून इतर आठजणांविरूद्धही शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
विठ्ठल रावसाहेब रोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र रणजित जगदाळे, रणजित किसन जगदाळे, सूरज राजेंद्र जगदाळे, बाळासाहेब गायकवाड व रवींद्र जगदाळे यांच्यासह चार ते पाच अनोळखी व्यक्तींविरूद्ध; तर राजेंद्र जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठल रोडे, लक्ष्मण रावसाहेब रोडे, जयवंत लक्ष्मण रोडे, निखिल विठ्ठल रोडे, लताबाई लक्ष्मण रोडे, अश्‍विनी जयवंत रोडे, कमल कैलास रोडे, प्रतीक्षा नीलेश रोडे यांच्याविरूद्ध बेकायदा जमाव जमवून लाकडी दांडके व लाथाबुक्‍क्‍यांनी हाणामारी, धमकी, शिवीगाळ केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करडे येथील गट क्रमांक 109 या जमिनीतील सात गुंठे जागेवरून जगदाळे व रोडे यांच्यात वाद आहे. दोघांच्या म्हणण्यानुसार ही जमीन त्यांच्या मालकीची आहे. जगदाळे हे संबंधित जागेची मोजणी करण्यासाठी सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास गेले असता रोडे कुटुंबीयांनी त्यांना जाब विचारात मारहाण केली. विठ्ठल रोडे यांच्या फिर्यादीनुसार संबंधित जागा त्यांच्या मालकीची आहे. जगदाळे यांनी मालकी हक्क दाखविल्याने त्याबाबतचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. 
आज सकाळी झालेल्या या हाणामारीत दोन्ही बाजूंनी लाकडी दांडके गजाचा वापर झाला आहे. दहशतीसाठी कुऱ्हाड, चाकूचा देखील वापर झाल्याने दोन्ही बाजूंच्या 13 जणांसह इतर चार ते पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक सुनील मोटे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com