मंत्रिमंडळ विस्तार झाला अन् बैलगाडा शर्यत सुरु करण्याच्या प्रक्रियेला ब्रेक!   

गिरीराज सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विभागाच्या सहसचिवांसमवेत बैठक घेतली होती.
  Amol Kolhe .jpg
Amol Kolhe .jpg

पिंपरी : केंद्रीय मंत्रिमंडळ (Union Cabinet) विस्तारामुळे राज्यातील अनेक खासदारांना लॉटरी लागली. पण, त्याचा फटका राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्याच्या प्रक्रियेला बसला आहे. या शर्यतीला पु्न्हा खो बसला आहे. कारण पशुसंवर्धनमंत्री बददल्याने आता त्यांच्याकडे ही बंद शर्यत पुन्हा चालू करण्याकरिता पुनश्च हरिओम करावा लागणार आहे. त्याला त्यासाठी प्रयत्न करणारे शिरूरचे (जि.पुणे) राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनीही दुजोरा दिला. (Union cabinet expansion breaks the process of starting bullock cart race) 

संसदेच्या मागील अधिवेशनात तत्कालीन पशुसंवर्धनमंत्री गिरीराजसिंह यांची खासदार कोल्हेंनी भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या बैलगाडा शर्यतीच्या परंपरेची माहिती दिली होती. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होण्याच्या दृष्टीने 'बैल' हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची आग्रही मागणी केली होती. या चर्चेदरम्यान गिरीराज सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विभागाच्या सहसचिवांसमवेत बैठक घेतली होती. त्यामुळे या अधिवेशनात 'बैल' हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्यासाठी काही तरी सकारात्मक घडेल अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलामुळे त्याला खो बसल्याने त्यासाठी पुन:श्च हरिओम करावा लागला आहे.

दरम्यान, ही प्रक्रिया पुन्हा सुरवातीपासून सुरु करताना कोल्हे यांनी बैलाला संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची जुन्या पशुसंवर्धनमंत्र्यांकडे केलेली मागणी या खात्याचे नवे मंत्री परशोत्तम रुपाला यांच्याकडे बुधवारी (ता.४) पुन्हा केली. या यादीतून बैलाला वगळले, तरच बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु होणार आहेत. बैलाचा समावेश त्या श्रेणीत केल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने या महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या बैलगाडा शर्यतीवर बंदी आणलेली आहे. ती उठवण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाले. 

त्यामुळे पुन:श्च हरिओमसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगत, तरीही हताश न होता पुन्हा एकदा ताज्या दमाने प्रयत्न सुरू केले असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी नवे पशुसंवर्धनमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी स्वरुपात वरील मागणी केली. बैलगाडा शर्यतींचा थरार त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी आर्थिक भार सोसून स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन बैलांची काळजी घेतात, त्यांचे संगोपन करतात याचा व्हिडिओही त्यांनी रुपालांना दाखवला. बैलगाडा शर्यतींची ४०० वर्षांची परंपरा व संस्कृती यांची माहिती दिली. 

त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळते हा मुद्दा स्पष्ट केला.पर्यटकांना बैलगाडा शर्यत आकर्षणाचे केंद्र ठरू शकते आणि त्यातून पर्यटन व्यवसायाला खूप मोठी चालना मिळू शकते हा वेगळा पण महत्त्वाचा मुद्दाही त्यांनी मांडला. देशी खिलार जातीचा बैल केवळ बैलगाडा शर्यतीसाठी वापरला जातो, त्याचा शेतीसाठी वापर होत नाही. परिणामी  देशी खिलार जातीच्या बैलांची संख्या पशुगणनेत ५५ टक्क्यांनी कमी झाली आहे ही अतिशय चिंतेची बाब आहे. त्यामुळे खिलार जातीचा हा देशी गोवंश वाचविणे व त्याचे संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्याची आवश्यकता आहे, ही बाब खा. कोल्हेंनी नव्या मंत्र्यांच्या आणली. तसेच हा देशी गोवंश वाचविण्यासाठी 'बैल' हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळणे गरजेचे असल्याचे सांगितले.

या भेटी संदर्भात खा.कोल्हे म्हणाले की, नव्या केंद्रीय पशुसंवर्धनमंत्र्यांनी विषय समजावून घेतला.तसेच यापूर्वी झालेल्या चर्चेची माहिती जुने मंत्री व सचिवांकडून घेऊन त्यांनी काय कार्यवाही केली त्याचा आढावा घेऊ,असे सांगितले.या विषयात लक्ष घालून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होण्यासाठी नक्कीच सकारात्मक निर्णय होईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com