थेऊर ग्रामपंचायतीवर पुन्हा दोन्ही तात्यांची सत्ता 

मतदारांनी विकासकामांना पसंती देत ग्रामपंचायतीची सुत्रे पुन्हा दोन्ही तात्यांच्या ताब्यात दिली आहे.
Both Tattya's power on Theur Gram Panchayat again
Both Tattya's power on Theur Gram Panchayat again

लोणी काळभोर (जि. पुणे) : हवेली तालुक्‍यातील थेऊर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राज्य साखर कामगार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे व पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण ऊर्फ तात्या काकडे यांचे नेतृत्वाखालील चिंतामणी ग्रामविकास पॅनेलने दहा जागा जिंकून बाजी मारली. यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब काकडे व माजी सरपंच नवनाथ काकडे यांच्या नेतृत्वाखाली महातारी आई माता ग्रामविकास पॅनेलला सात जागांवर समाधान मानावे लागले. 

थेऊर ग्रामपंचायतीच्या निकालाचा कल पाहता येथील मतदारांनी विकासकामांना पसंती देत ग्रामपंचायतीची सुत्रे पुन्हा दोन्ही तात्यांच्या ताब्यात दिली आहे. पहिलवान विलास कुंजीर यांच्या जय गणेश परिवर्तन आघाडीच्या चारही उमेदवारांना मतदारांनी विजयापासून दूर ठेवल्याने आघाडीच्या गटात सन्नाटा पहावयास मिळाला. 

थेऊर ग्रामपंचायतीवर मागील पाच वर्षांपासून राज्य साखर कामगार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे व पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे यांची सत्ता आहे. या दोन्ही नेत्यांनी मागील पाच वर्षांच्या काळात बेरजेचे व विकासाचे राजकारण केल्याने, मतदारांनी या दोन्ही नेत्यांच्या हाती सत्ता दिली आहे. राज्य साखर कामगार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे व पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे यांचे नेतृत्वाखालील चिंतामणी ग्रामविकास पॅनेलने वर्चस्व प्रस्थापित केल्याने विरोधकांचे सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे उद्‌ध्वस्त झाले. 

प्रभाग क्रमांक एकमधून म्हातारी आई माता ग्रामविकास पॅनेलचे संतोष किसन काकडे, गणेश सुदाम गावडे, चंद्रभागा ईश्वर शिर्के यांनी विजय मिळविला. प्रभाग क्रमांक दोनमधून महातारी आई ग्रामविकास पॅनेलचे संजय महादेव काकडे व चिंतामणी ग्रामविकास पॅनेलचे शशीकला दत्तात्रेय कुंजीर, रुपाली गणेश रसाळ हे विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक तीनमधून चिंतामणी ग्रामविकास पॅनेलचे विठ्ठल रामचंद्र काळे,मंगल महादेव धारवाड हे विजयी झाले आहेत. 


प्रभाग क्रमांक चारमधून चिंतामणी ग्रामविकास पॅनेलचे आप्पासाहेब रामचंद्र काळे, गौतमी मारुती कांबळे व राहुल शनिदेव कांबळे हे विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक पाचमधून महातारी माता ग्रामविकास पॅनेलचे मनीषा नवनाथ कुंजीर, जयश्री भरत कुंजीर व पल्लवी गणेश सांळुखे विजयी झाले. 

थेऊर गावचे सर्वाधिक लक्ष लागलेल्या प्रभाग क्रमांक सहामधून चिंतामणी ग्रामविकास पॅनेलचे युवराज हिरामण काकडे, शीतल शरद काकडे व सीमा सुखराज कुंजीर यांनी दणदणीत विजय मिळवल्याने विरोधकांची मोठी निराशा झाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com