कोणाचेही सरकार आले तरी अजितदादा उपमुख्यमंत्री! हे म्हणजे सौ चूंहे खाॅं के...

अजित पवारांना राज्यात कोरोनाचे संकट भीषण झालेले असतानाही दोनदा पंढरपुरात येऊन राजकीयदृष्ट्या फार महत्व नसलेल्या लोकांच्या घरी जावे लागले.
 Ajit Pawar, Chandrakat Patil .jpg
Ajit Pawar, Chandrakat Patil .jpg

मुंबई : राज्यात सत्ताबदल होणार हे नक्की असून तो कसा होणार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) माहिती आहे असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी म्हटले आहे. तसेच पंढरपूर-मंगळवेढ्याची पोटनिवडणूक भाजपचे उमेदवार समाधान आवताडे जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाटील एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.BJP state president Chandrakant Patil criticizes Deputy Chief Minister Ajit Pawar 

यावेळी पाटील म्हणाले, ''अजित पवारांना राज्यात कोरोनाचे संकट भीषण झालेले असतानाही दोनदा पंढरपुरात येऊन राजकीयदृष्ट्या फार महत्व नसलेल्या लोकांच्या घरी जावे लागले. हा त्यांचा स्वभाव नाही, तो राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा स्वभाव आहे. निवडणूक त्यांच्या हातून गेल्याचे हे लक्षण असल्याचे पाटील म्हणाले. ज्याप्रकारे ते बोलत आहेत त्यावरुन पायाखालची जमीन सरकली आहे असे दिसत आहे. पायाखालची जमीन सरकली ही जिभेवरचा ताबा सुटतो. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याची पोटनिवडणूक भाजप जिंकणार हे स्पष्ट आहे,''असल्याचे पाटील म्हणाले.

''अजित पवारांना काय झाले आहे माहिती नाही. पण अलीकडच्या काळात ते जोरात आहेत. हिंदीमध्ये म्हण आहे की 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली,' असा टोला यावेळी पाटील यांनी पवार यांना लागावला.

पुढे बोलताना ते म्हणाले, ''मला कधी कधी आश्चर्य वाटते शरद पवारांवरील माझी 'पीएचडी' अद्याप अपूर्ण आहे. पण आता अजित पवारांवर मी अभ्यास करणार आहे. त्यासाठी मी काही प्राध्यापकांना भेटणार आहे. इतके सगळे प्रकार करुनही छातीठोकपणे कसे बोलतात याचा अभ्यास करणार आहे. यांच्यावर सिंचनच्या केसेस, राज्य सहकारी बँकेची चौकशी संपलेली नाही. 

महाराष्ट्रात जो कारखाना बंद पडेल तो हे विकत घेतात. पवार कुटुंबाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किती साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. इतके केल्यानंतरही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हे उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही हे उपमुख्यमंत्री… उद्या येणार नाही पणकम्युनिस्टांचे राज्य आले तरी हेच उपमुख्यमंत्री'' असतील.

सत्ता बदल करणारा अजून जन्मला यायचा आहे, असे अजित पवार बुधवारी पंढपूरात झालेल्या सभेत बोलले होते. त्यावर पाटील यांनी उत्तर दिले. पाटील म्हणले, ''अजित पवार जास्त गमजा मारु नका. कालचक्र नेहमी फिरत असते. ते आम्हालाही लागू पडते. माणसाने नेहमी नम्र राह्याला पाहीजे. सरकार पडणार नसेल तर इतका आकांडतांडव कशासाठी? एखाद्याला आजार झाला नसेल तर त्यांना आजार झाला नाही म्हणण्याचे कारण नाही.BJP state president Chandrakant Patil criticizes Deputy Chief Minister Ajit Pawar

तुम्हाला सरकार पडणार आहे याची जाणीव आहे. कधी आणि कसे पडणार हे ही तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही खोटा आव आणता. जेव्हा सरकार पडेल तेव्हा सर्व टाइमटेबल माहिती होते असे मान्य कराल,'' असे पाटील यांनी म्हटले आहे. मला 'चंपा' म्हणने त्यांच्या लोकांनी काही काळ थांबवले होते. पुन्हा आता ते सुरु झाले आहे, मलाही त्यांच्या नावाचे शॉर्टफॉर्म तयार करावे लागतील असा इशारा पाटील यांनी दिला.

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com