भाजप आमदार कुल गटाच्या नेत्याने धुडकावला जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

ध्वनिवर्धकावर गाणी लावून युवकांना पोहण्याची मुभा देण्यात आली.
BJP MLA Rahul Kul's group leader disobeyed District Collector's order :
BJP MLA Rahul Kul's group leader disobeyed District Collector's order :

दौंड (जि. पुणे) : दौंड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना येथील नगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या गटाच्या नागरिक हित संरक्षण मंडळाच्या (माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची आघाडी) गटनेत्याने विना परवानगी नगरपालिकेचा जलतरण तलाव ( स्विमिंग टॅंक) खुला करून जिल्हा प्रशासनाला आव्हान दिले आहे. जिल्हाधिकारी यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्यानंतरही कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. 

दौंड शहरातील महावितरण उपकेंद्राच्या पाठीमागे असणारा जलतरण तलाव रविवारी (ता. 14 मार्च) नागरिक हित संरक्षण मंडळाचे नगरपालिकेतील गटनेते राजेश गायकवाड यांनी कोणतीही परवानगी न घेता खुला केला. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस आघाडीचे शहराध्यक्ष प्रशांत धनवे यांच्या हस्ते या वेळी पूजनही करण्यात आले. ध्वनिवर्धकावर गाणी लावून युवकांना पोहण्याची मुभा देण्यात आली. 

कारवाईची भीती नसल्याने तलाव खुला केला तरी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याकरिता कोणताही जीवरक्षक तैनात करण्यात आला नव्हता. जे युवक पाण्यात उतरले होते, त्यांच्यासाठी सुरक्षा उपकरणे देखील उपलब्ध नव्हती. 

एकूण 2 कोटी 62 लाख रूपये खर्च करून बांधण्यात आलेला जलतरण तलाव 82 फूट लांब, 39 फूट रूंद व 8.2 फूट खोल आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये या तलावाला वापराआधीच गळती लागली होती. 

याबाबत दौंड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांनी सांगितले की, जलतरण तलाव उघडण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जलतरण तलाव सील करण्याची कारवाई केली जात आहे. 


हेही वाचा : आमदार अशोक पवारांचे संचालकपद सहकारमंत्र्यांच्या हाती ! 


शिरूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्‍यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सुमारे पाच एकर जागा, स्वतःच्या शैक्षणिक संस्थेला दिल्याच्या आरोपामुळे, कारखान्याचे अध्यक्ष, आमदार ऍड. अशोक पवार यांच्याविरोधात उच्च न्यायालयात गेलेल्या वादावर येत्या 23 मार्चला फैसला होणार आहे. याबाबत 15 एप्रिलपूर्वी गुणवत्तेवर निकाल देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने थेट सहकार मंत्र्यांना दिल्याने पवार यांचे कारखान्याचे संचालक पद "जाणार की राहणार' याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

भारतीय जनता पक्ष व शिवसेनेने याबाबत येथे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे, भाजप सहकार आघाडीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब खळदकर व शिरूर खरेदी-विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे या वेळी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com