अजित पवारांनी आटपाडीमधून निवडणूक लढवली तर त्यांचेही तेच होईल!  - BJP MLA Gopichand Padalkar criticizes Deputy Chief Minister Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

अजित पवारांनी आटपाडीमधून निवडणूक लढवली तर त्यांचेही तेच होईल! 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 20 जून 2021

बारामतीकरांनी मागील विधानसभा निवडणुकीत माझे डिपॉझिट जप्त केले, हा विषय शिळा झाला.

बारामती : मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द झाल्यामुळे समाजात संताप आहे. ओबीसींचे (OBC) राजकीय आरक्षण (Political Reservation) रद्द झाल्याने ३४६ जातींच्या राजकीय प्रश्न निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pwar) यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीने ७ मेला २००४ च्या पदोन्नतीच्या कायद्याला स्थगिती दिली. त्यावर काँग्रेस मंत्र्यांनी आक्रमक होत राजीनामे देण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. मात्र, त्याला केराची टोपली दाखविण्यात आली. राज्यातील कॉंग्रेसचे मंत्री सत्तेसाठी लाचार झाले आहेत, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. (BJP MLA Gopichand Padalkar criticizes Deputy Chief Minister Ajit Pawar)

हे ही वाचा : सारथी संस्थेला स्वायत्तता; मराठा समाजासाठी विविध सवलती

घोंगडी बैठकाच्या निमित्त बारामती दौऱ्यावर आलेले पडळकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. हिंमत असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हान पडळकर यांनी दिले. बारामतीकरांनी मागील विधानसभा निवडणुकीत माझे डिपॉझिट जप्त केले, हा विषय शिळा झाला. स्वतःच्या जिल्ह्यात अजित पवार यांचा मुलगा लोकसभा निवडणुकीत दीड ते दोन लाखाने पराभूत झाला. निवडणुकीआधी अवघ्या १५ दिवसांपूर्वी पक्षाने मला बारामतीतून लढण्यास सांगितले होते. अजित पवार यांनी माझ्या आटपाडी मतदारसंघात एवढ्या कमी कालावधीत निवडणूक लढवली तर त्यांचेही तेच होईल, असे पडळकर म्हणाले. 

अजित पवार वारंवार बारामतीत माझे डिपॉझिट जप्त झाल्याचे सांगत आहेत. आरक्षणाच्या याविषयावर त्यांनी बोलावे. मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती पहिल्यापासून काम करत आहेत. ते भाजपचे म्हणून नव्हे तर समाजाचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत, असेही पडळकर म्हणाले. 

हे ही वाचा :  अजितदादांना पिंपरी-चिंचवडमध्ये चितपट करु: आमदार जगतापांचे खुले आव्हान

अजित पवार काय म्हणाले होते. 

मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. बारामतीकरांनी ज्यांचे डिपॉझिट जप्त केले आहे, त्यांच्याबद्दल काय बोलणार? त्यांची योग्यता बारामतीकरांनी मागील विधानसभा निवडणुकीतच ओळखली आहे, असा टोला पवार यांनी पडळकर यांना लगावला होता.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख