भाजपने उत्तम संघटक गमावला 

त्यांच्या निधनाने भाजपसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.
 Dharamchand Chordia .jpg
Dharamchand Chordia .jpg

धुळे : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे माजी आमदार धरमचंद चोरडिया (वय ७१) यांचे आज बुधवारी (ता. १०) दुपारी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने भाजपसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

चोरडीया  १९७७ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी १९ महिने कारावासही भोगला होता. भाजपमध्ये त्यांनी विविध पदांची जबाबदारी सांभाळली होती. ते १९७८-१९८१ या कार्यकाळात भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस, १९८२ मध्ये राष्ट्रीय सरचिटणीस, १९८३-१९८७ भाजप प्रदेश चिटणीस, १९८७ पासून सहा वर्ष प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांनी पक्षाचे काम पाहिले. १९८४ ते १९९० दरम्यान ते धुळे नगरपालिकेचे सदस्यही होते. 

त्यानंतर १९९२ मध्ये त्यांची विधान परिषदेवर निवड झाली होती. धुळे जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपदी त्यांनी भूषविले होते. चोरडिया यांच्या निधनाने भाजपच्या पहिल्या फळीतील अभ्यासू व संघटनात्मक पातळीवर अत्यंत पायाभूत काम करणारे, आक्रमक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याच्या भारतीय जनता पक्षाकडून प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या. 

विधान परिषदेचे आमदार असतांना १९९२ मध्ये त्यांचा जोधपूर येथे कार्यक्रमास जात असतांना अपघात झाला होता. त्यानंतर ते सक्रीय राजकारणापासून लांब गेले होते. धुळ्यात माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह जेही नेते आले त्यांनी चोरडिया यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.  

Edited By - Amol Jaybhaye
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com