भाजपला पुन्हा मिळाला मैदानात लढणारा नेता 

मग मतदार यादी वेगळ्या कालावधीची आणि ऊस घालण्यासाठी वेगळा कालावधी कसा?
BJP leader Dilip Khaire's candidature application valid for Someshwar sugar factory election
BJP leader Dilip Khaire's candidature application valid for Someshwar sugar factory election

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप खैरे यांचा उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी शुक्रवारी (ता. 5 मार्च) वैध ठरवला. यामुळे 'सोमेश्वर'च्या निवडणुकीतील रंगत कायम राहणार असून भाजपच्या पॅनेलला पुन्हा मैदानात लढणारा नेता मिळणार आहे. 

सोमेश्वर कारखान्याची निवडणूक 15 फेब्रुवारीपासून सुरू झाली. ता. 22 फेब्रुवारीपर्यंत आलेल्या उमेदवारी अर्जांची 23 तारखेला छाननी झाली. यामध्ये पाच वर्षांपैकी तीन वर्षे ऊस न आलेल्या अनेक सभासदांचे अर्ज बाद झाले. यामध्ये भाजपचे नेते व पुणे बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांच्यासह 94 अर्ज बाद करण्याचा निर्णय प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिला होता.

सुनावणीनंतरही खैरे यांचा अर्ज फेटाळला. याबाबत खैरे यांनी प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे अपिल करत दाद मागितली. यावर सुनावणी होऊन आज दिलीप खैरे यांचा अर्ज मंजूर करण्याचा निर्णय जाहीर केला. 

सुनावणीत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस. कुंभार व कारखान्याचे सचिव यांनी बाजू मांडली. सहकार कायद्यानुसार केलेल्या पोटकलमामध्ये निवडणुकीच्या लगतच्या पाच हंगामापैकी तीन हंगामात ऊस येणे बंधनकारक आहे. त्यानुसार चालू निवडणुकीसाठी 2015-16 ते 2019-20 या कालावधीपैकी खैरे यांचा दोनदा ऊस आला होता. त्यामुळे अर्ज फेटाळला, अशी बाजू मांडली. 

खैरे यांनी याविरोधात युक्तिवाद केला. कारखान्याची निवडणूक 19 फेब्रुवारी 2020 रोजी लागली होती. त्यासाठी एप्रिल 2018 अखेरची मतदार यादी निश्‍चित करण्यात आली. मात्र, निवडणूक चार वेळा पुढे ढकलली. मात्र पुन्हा आहे, त्याच टप्प्यावरून 15 फेब्रुवारी 2021 पासून सुरू झाली आहे. मतदार यादी एप्रिल 2018 अखेरचीच ठेवली आहे. मग मतदार यादी वेगळ्या कालावधीची आणि ऊस घालण्यासाठी वेगळा कालावधी कसा? त्यामुळे 2015-16 ते 2019-20 हा कालावधी चुकीचा आहे. त्याऐवजी 2014-15 ते 2018 हाच कालावधी धरावा. त्या कालावधीत पाचपैकी तीन वर्षे ऊस आला आहे, अशी खैरे यांची बाजू मान्य करण्यात आली. 

खैरे यांच्याशिवाय भाजपचा पॅनेल कमजोर झाल्याने पॅनेल पडणार की गुंडाळण्यात येणार? अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, खैरे यांचे पुन्हा पॅनेलमध्ये इन्कमिंग झाल्याने चैतन्य येणार आहे. 

न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास होता, त्यामुळे माझा अर्ज वैध ठरणार आणि मी परत येण्याची खात्री होती. सभासदांना न्याय देण्यासाठी लढत राहणार आहे. 
-दिलीप खैरे, भाजप नेते 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com