आढळराव-वळसे पाटलांनी श्रेय घ्यावे; पण आता नगरपंचायत मंजूर करावी - Bjp is aggressive for getting Manchar Nagar Panchayat sanctioned | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

आढळराव-वळसे पाटलांनी श्रेय घ्यावे; पण आता नगरपंचायत मंजूर करावी

डी. के. वळसे पाटील
रविवार, 4 जुलै 2021

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंचर नगरपंचायतीचा प्रश्न मार्गी लावावा.

मंचर : मंचर (Manchar) नगरपंचायत मंजूर होण्यासाठी भारतीय जनता पक्ष (Bjp) आक्रमक झाला आहे. हा प्रश्न तडीस लावण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे यापुढे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांच्यामध्ये वादंग सुरु होणार आहे. (Bjp is aggressive for getting Manchar Nagar Panchayat sanctioned)

हेही वाचा :...म्हणून मी गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगड टाकला

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंचर नगरपंचायतीचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन उभारेल. असा इशारा भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे यांनी दिला आहे. ते म्हणाले “दहा वर्षापासून प्रलंबित असलेली मंचर नगर पंचायत मंजूर होणार असे मंचर ग्रामपंचायतीची निवडणूक होण्यापूर्वी  डिसेंबर २०२० मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना नेत्यांनी श्रेय वादाची लढाई करत घोषणाबाजी केली होती. पण सध्या प्रशासन पातळीवर कोणतीही हालचाल नाही. मंचरकरांना झुलत ठेवण्याचा प्रकार आत्ता उघडकीस आला आहे.”
    
मंचर (ता.आंबेगाव) येथे रविवारी (ता.४) झालेल्या पत्रकार परिषदेत एरंडे बोलत होते. यावेळी भाजपचे पुणे जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात, तालुका अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, विजयराव पवार, संदीप बाणखेले, बाबू थोरात, नवनाथ थोरात उपस्थित होते. “नगरपंचायतच्या मंजुरीची कार्यवाही सध्या बारगळली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जरूर श्रेय घ्यावे. त्याला आमची हरकत नाही. पण नगरपंचायत झालीच पाहिजे. कचरा व आरोग्याची समस्या भेडसावत आहे.” असे डॉ. कराळे यांनी सांगितले.

हेही वाचा : भापजची खेळी फेल करण्यासाठी ठाकरे सरकारचा हा प्लॅन

“मंचर शहराने ६० हजार लोकसंख्येचा टप्पा ओलांडला आहे. नागरी सुविधासाठी नगरपंचायत होणे गरजेचे आहे. मंचर ग्रामपंचायतीचा पूर्वीचा व आत्ताचा कारभार संशयास्पद आहे. १४ व्या वित्त आयोगातील ७७ लाख रुपये निधीचा हिशोब दिला जात नाही. नव्या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम अधांतरी आहे. आर्थिक दिवाळखोरीत ग्रामपंचायत गेली आहे. झालेल्या कामांचे दिलेले धनादेश वटत नाहीत. कामकाज ठप्प आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करावी. ग्रामपंचायत बरखास्त करावी. नगरपंचायत मंजुरीसाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची शिष्ठ मंडळ भेटणार असल्याचे संजय थोरात, यांनी सांगितले.   

Edited By - Amol Jaybhaye   

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख