वळसे पाटलांचा भीमाशंकर कारखाना ठरला देशात नंबर वन  - Bhimashankar became the best co-operative sugar factory in the country this year | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

वळसे पाटलांचा भीमाशंकर कारखाना ठरला देशात नंबर वन 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 28 जानेवारी 2021

यंदाचा पारितोषिक वितरण सोहळा गुजरातेतील स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात २६ मार्च रोजी होणार आहे.

पुणे : राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (ता. आंबेगाव, जि. पुणे) यंदाचा देशातील देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना ठरला आहे. त्यासाठी देण्यात येणारा वसंतदादा पाटील पुरस्कार या कारखान्याने पटकावला आहे. 

देशातील साखर उद्योगाची राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता पारितोषिके आज जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेस राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आणि महाराष्ट्र सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ या वेळी उपस्थित होते. 

दरम्यान, गुजरात राज्यातील सहकारी खांड उद्योग, गणदेवी हा उच्च उतारा विभागातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना ठरला आहे. तर, उर्वरित विभागात उत्तर प्रदेशातील नजियाबाद साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी आज (ता. २८ जानेवारी) दिली. 

यंदाचा पारितोषिक वितरण सोहळा गुजरातेतील स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात २६ मार्च रोजी होणार आहे. या वेळी ‘जागतिक आव्हाने व भारतीय साखर उद्योगाला संधी’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. या कार्यक्रमास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय अन्न राज्यमंत्री रावसाहेब दानवे, गुजरातचे मुख्यमंत्री तसेच साखर उद्योगाशी संबंधितांना निमंत्रित करण्यात येणार आहे. गुणवत्ता पारितोषिकांसाठी देशभरातून ९२ सहकारी साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. 

राष्ट्रीय स्तरावरील अन्य पारितोषिक विजेते कारखाने 

उत्कृष्ट ऊस उत्पादकता : प्रथम डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना सांगली, द्वितीय- अजिंक्यतारा साखर कारखाना सातारा. 
तांत्रिक कार्यक्षमता : विघ्नहर साखर कारखाना जुन्नर, द्वितीय - क्रांती अग्रणी डॉ. लाड सहकारी साखर कारखाना. 
उत्कृष्ट ऊस उत्पादकता उर्वरित विभाग : प्रथम- कर्नाल कारखाना हरियाणा, द्वितीय- किसान सहकारी चीनी मिल, उत्तर प्रदेश. 
तांत्रिक कार्यक्षमता : प्रथम- साथियोन सहकारी साखर कारखाना आझमगड, द्वितीय- कॅथर साखर कारखाना हरियाणा. 
उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन : प्रथम- नर्मदा खांड उद्योग गुजरात, द्वितीय- कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखाना जालना. 
उर्वरित विभाग : प्रथम- चेय्यार सहकारी साखर कारखाना तामिळनाडू, द्वितीय- कल्लाकुरची साखर कारखाना. 
विक्रमी उस गाळप : खेडुत साखर कारखाना बारडोली गुजरात, उर्वरित विभाग- रमाला साखर कारखाना उत्तर प्रदेश. 
विक्रमी उस उतारा: कुंभी सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर आणि किसान साखर कारखाना उत्तर प्रदेश. 
विक्रमी साखर निर्यात : प्रथम- जवाहर साखर कारखाना कोल्हापूर, द्वितीय- सह्याद्री साखर कारखाना कराड.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख