ग्रामपंचायत रणधुमाळीतही भरणे-पाटलांचे लक्ष्य विधानसभाच! 

विधानसभेच्या काठावरच्या मतधिक्‍यामुळे सध्या होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला विशेष महत्व आहे.
Bharne-Patil's preparation for the Vidhan Sabha through Gram Panchayat elections
Bharne-Patil's preparation for the Vidhan Sabha through Gram Panchayat elections

शेटफळगढे (जि. पुणे) : गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत इंदापुरात राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा 3 हजार 110 मतांनी पराभव केला होता. विधानसभेच्या या काठावरच्या मतधिक्‍यामुळे तालुक्‍यात सध्या होत असलेल्या 60 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला विशेष महत्व आहे. या निवडणुकीत आपल्या विचाराच्या व्यक्तीची ग्रामपंचायतीत सत्ता असावी. यासाठी या दोन आजी-माजी मंत्र्यांनी लक्ष घातले आहे. विधानसभेच्या काठावरच्या मतांच्या गणितामुळे या दोघांची ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

निवडणुका कोणत्याही असल्या तरी इंदापूर तालुक्‍याचे राजकारण जिल्ह्यात नेहमीच चर्चेत राहिले आहे. याला येत्या 15 जानेवारीला मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतीही अपवाद नाहीत. कारण 2019 मधील विधानसभा निवडणुकीत मंत्री भरणे यांना 1 लाख 14 हजार 960, तर माजी मंत्री पाटील यांना 1 लाख 11 हजार 850 मते मिळाली होती. हा फरक 3 हजार 110 मतांचा आहे. हा फरक आगामी निवडणुकीत कमी किंवा जास्त करण्यासाठी व निकाल कायम ठेवण्यासाठी किंवा बदलविण्यासाठी ग्रामपंचायत हे महत्वाचे साधन आहे. 

राज्य व केंद्र सरकार, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक व सार्वजनिक योजनांची अंमलबजावणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होते, त्यामुळे ग्रामपंचायतीची सत्ता आपल्या विचाराच्या व्यक्तीच्या हाती असावी. याकरिता या दोन्ही आजी-माजी मंत्र्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातले आहे. यासाठी पॅनेल बांधणी, बंडखोरी थोपविणे, काही ग्रामपंचायती व सदस्यांच्या जागा बिनविरोध करणे, पॅनेलच्या विजयाबाबतची माहिती घेणे, गरज असेल त्यास बोलावून घेणे व नाराजाची समजूत काढणे तसेच आपल्या विरोधकांच्या गावच्या व परिसरातील ग्रामपंचायतीत उमेदवार उभे करण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी प्रयत्न केले आहेत. ज्या ग्रामपंचातीत आपल्या विचाराचे दोन्ही पॅनेल आहेत. अशा ठिकाणी या दोन्ही नेत्यांनी कोणाचीच नाराजी नको; म्हणून अलिप्त राहणे पसंत केले आहे. 

विधानसभेच्या काठावरच्या मतधिक्‍याच्या गणितामुळे काही करून ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविण्याची सूचना या दोन्ही आजी-माजी मंत्र्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यातून विधानसभेची पायाभरणी करण्याचा दोन्ही नेत्यांचा प्रयत्न आहे. पण, ग्रामपंचायत ताब्यात असूनही पदाधिकाऱ्यांनी जनतेसाठी काहीच योजना राबविल्या नाहीत. ग्रामपंचायत ताब्यात असूनही नेत्यांना विधानसभेला हीच जनता हिसका दाखवत असते, त्यामुळेच आगामी काळात तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून काठावरच्या मतदारांना आपलेसे करण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पुन्हा पणाला लावली आहे. 


बाजार समितीही डोळ्यासमोर 

पूवीप्रमाणेच बाजार समितीवर ग्रामपंचायत सदस्यांमधून 4 संचालक निवडून दिले जाणार आहेत. इंदापूर बाजार समितीची येत्या वषर्भरात निवडणूक होत आहे. त्यामुळे या 60 ग्रामपंचायतींमधून आपल्या विचाराचे जास्तीत जास्त ग्रामपंचायत सदस्य निवडून आणण्यासाठी या दोन्ही आजी-माजी मंत्र्यांनी सक्रीय लक्ष घातले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com