आमच्यामुळे शिवसेना सत्तेत, याचे भान ठेवा : राष्ट्रवादीच्या आमदाराचा सेना नेत्याला इशारा

कोणाही शिवसेना कार्यकर्त्याला आढळरावांनी मोठे केले नाही.
Because of us, Shiv Sena is in power, be aware of this : NCP MLA warns Sena leader
Because of us, Shiv Sena is in power, be aware of this : NCP MLA warns Sena leader

राजगुरूनगर (जि. पुणे) : आमच्यामुळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) शिवसेना राज्यात सत्तेत आहे, याची जाण ठेवा. आपल्याच पक्षाचे सरकार असताना आंदोलन कसले करता? राष्ट्रवादी कॉंग्रेसही रस्त्यावर उतरू शकते, पण आम्ही भान ठेवतो. माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांची तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे करणार आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी आढळराव पाटील यांना प्रत्युत्तर दिले.

खेड पंचायत समितीच्या इमारतीसंदर्भात शनिवारी (ता. १३ मार्च) पत्रकार परिषद घेऊन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आमदार मोहितेंवर टीका केली होती. त्याबाबत रविवारी (ता. १४ मार्च) पत्रकार परिषद घेऊन मोहिते यांनी प्रत्युत्तर दिले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, अरुण चांभारे आदी उपस्थित होते. 

हा कुठला न्याय?

शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही पाठिंबा देतोय आणि शिवसेनेचे उपनेते असलेले आढळराव येथे आम्हाला विरोध करत आहेत, हा कुठला न्याय? असा सवालही त्यांनी केला. खेड तालुक्याच्या विकासाला विरोध करण्याचे आढळरावांचे पहिल्यापासूनचे धोरण आहे, त्यांच्यामुळेच विमानतळ, एसईझेड असे मोठे प्रकल्प तालुक्यात झाले नाहीत, असाही आरोप मोहिते यांनी केला. 

आम्ही वयाचा मान ठेवतो

आढळराव यांनी माझ्याबद्दल अपशब्द वापरले, पण त्यांच्या वयाचा मान ठेवून आम्ही तसे बोलणार नाही. पण, आमच्यामुळे शिवसेना सत्तेत याची जाण ठेवा. आपल्याच पक्षाचे सरकार असताना आंदोलन कसले करता? राष्ट्रवादीही रस्त्यावर उतरू शकते, पण आम्ही भान ठेवतो, असेही मोहिते म्हणाले.

एकाही कार्यकर्त्याला मोठे केले नाही 

जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे कमर्शियल पुढारी, जो आमदार त्याच्यामागे ते जातात.  राम गावडे, अमृता गुरव यांना का सोडून गेले? कोणाही शिवसेना कार्यकर्त्याला आढळरावांनी मोठे केले नाही, असा आरोपही मोहिते यांनी आढळराव यांच्यावर केला. 

शिवसेनेचे सदस्यही आमच्यासोबत

सध्या इमारत प्रस्तावित असलेल्या जागेत खेड तालुक्याची प्रशासकीय इमारत करण्याबाबत शिवसेनेचे काही पंचायत समिती सदस्य आणि पदाधिकारीही माझ्याबरोबर आहेत, असा दावा करून अधिकाऱ्यांच्या समितीने प्रशासकीय इमारतीसाठी ती जागा योग्य असल्याचा अहवाल दिला, असल्याचे मोहिते यांनी सांगितले. 

दरेकरांना जिल्हा परिषद अध्यक्षा पानसरेंचे उत्तर

पुणे जिल्हा परिषदेत हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे. पडद्यामागून वेगळी शक्ती काम करीत आहे. इमारतीची जागा महसूल खात्याला देण्याचा ठराव मंजूर होणार नसेल तर राजीनामा द्या, अशी धमकी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांना देण्यात आली होती,'' असा आरोप शिवसेनचे जिल्हा परिषद सदस्य तथा विरोधी पक्षनेते देविदास दरेकर यांनी केला होता. त्यांना अध्यक्षा पानसरे यांनी उत्तर दिले आहे. ‘‘खेड पंचायत समितीच्या इमारतीसाठीची जागा महसूल विभागास देण्यास सभागृहाने बहुमताने ठराव मंजूर केला. एकट्या अध्यक्षांच्या मनावर काही नसते,’’ असे स्पष्टीकरण निर्मला पानसरे यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com