गृहमंत्र्यांच्या नावाने पाच लाखांची मागणी करणाऱ्या बार्शीच्या पीआयची चौकशी

या बाबतचा अंतिम अहवाल अभिजीत धाराशिवकर हेच सादर करणार आहेत.
Barshi police inspector Santosh Girigosavi is Inquiry over a demand of Rs 5 lakh
Barshi police inspector Santosh Girigosavi is Inquiry over a demand of Rs 5 lakh

पुणे  ः कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे पोलिस निरिक्षक संतोष गिरीगोसावी यांची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी सुरु केली आहे.  बारामतीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

या संदर्भतील चौकशी निपक्षपातीपणे व्हावी या साठी विशेष पोलिस महानिरिक्षकांनी मिलिंद मोहिते यांना बार्शी येथे पाठवले होते. त्या संदर्भात मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली. 

बार्शी येथील चांदमल ज्वेलर्सचे मालक अमृतलाल गुगळे यांच्यावर कारवाई टाळण्यासाठी पाच लाखांची मागणी केल्याची तक्रार गुगळे यांनी केली होती. विशेष म्हणजे पैशांची मागणी करताना त्यात थेट गृहमंत्र्यांपर्यंत ही रक्कम पोचवावी लागते, असा उल्लेख केल्याचे गुगळे यांनी सांगितल्याने हे प्रकरण गंभीर बनले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यापर्यंत या बाबतच्या तक्रारी गेल्यानंतर पोलिस महासंचालक स्तरावरून या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे विशेष पोलिस महानिरिक्षकांनी मिलिंद मोहिते यांना या चौकशीचे पर्यवेक्षण करण्यास सुचविले होते. त्या नुसार मोहिते यांनी या चौकशीची सर्व माहिती घेत पोलिस महानिरीक्षकांना त्याची माहिती दिली. 

या बाबतचा अंतिम अहवाल अभिजीत धाराशिवकर हेच सादर करणार आहेत, असेही बारामती अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोहिते यांनी नमूद केले. या प्रकरणी दोन्ही बाजूंशी बोलून वस्तुस्थिती वरिष्ठांपर्यंत पोहोचविणाचे काम केले जाईल, अहवाल सादर झाल्यानंतर वरिष्ठच या बाबत काय असेल तो निर्णय करतील, असे मोहिते यांनी सांगितले. पोलिस दलाच्या प्रतिमेचा हा मुद्दा असल्याने वरिष्ठ स्तरावरुनही याची दखल गांभीर्याने घेतली गेली आहे.

काय आहे प्रकरण 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात फक्त वैद्यकीय सुविधा सोडता अन्य कोणाला ही दुकाने  सुरु ठेवण्यास परवानगी नाही. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अमृतराव गुगळे या सराफ व्यावसायिकाने कडक निर्बंधांमध्ये सोन्याचे दुकानं सुरु ठेवल्याने काल बार्शी शहर पोलिसांनी दुकानं सील केलं होते. मात्र, बार्शी शहराचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी तब्बल 5 लाख रुपयांची मागणी केली आणि ते देण्यास नकार दिल्याने दुकानं सील केल्याचा आरोप सराफ व्यापारी गुगळेंनी केला आहे.

‘हे सर्व हप्ते गृहमंत्रालयापर्यंत पोचवावे लागतात,'' असं ही पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावींनी सराफ व्यावसायिक गुगळेंना म्हटल्याचा आरोप केला आहे. याबाबतचा व्हिडिओ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ट्वीट करत या प्रकरणाला उजेडात आणलं आहे. 

या संपूर्ण प्रकरणासंदर्भात पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्याशी दूरध्वनी द्वारे बातचीत केली असता, त्यांनी हे संपूर्ण आरोप फेटाळले आहेत आणि संबंधित सराफ व्यापाऱ्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com