बारामती पोलिसांचे ऑपरेशन माळेगाव : चार गुन्हेगारांना मोक्का  - Baramati police operation Malegaon | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

बारामती पोलिसांचे ऑपरेशन माळेगाव : चार गुन्हेगारांना मोक्का 

कल्याण पाचांगणे 
मंगळवार, 15 जून 2021

अकार्यक्षम पोलिसांचीही साफसफाई होणार

माळेगाव : माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथील राष्ट्रवादीचे (NCP) कार्यकर्ते रविराज तावरे (Raviraj Taware) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील अल्पवयिन मुलासह चार आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे. ऐवढ्यावर पोलिस प्रशासन थांबणार नसून  यापुढे 'ऑपरेशन माळेगाव' राबविण्यास सज्ज झाले आहे. त्यामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांबरोबर सावकारी करणाऱ्या लोकांची यादी करणे, गावटी कट्टे व इतर शस्त्र शोध मोहिम राबविणे, महिला सुरक्षितता आणि लहान मुलांचा वापर गुन्ह्यात होऊ नये या संबंधी ठोस कारवाई करणारा अॅक्शन प्लॅन तयार आहे. विशेषतः या मोहिमेत गुंड प्रवृत्ती ठेचून काढण्याबरोबर माळेगावच्या पोलिसांचीही कार्यक्षमता तपासली जाणार आहे. (Baramati police operation Malegaon) 

अकार्यक्षम पोलिसांचीही साफसफाई होणार आहे, अशी ठोस भूमिका अप्पर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहिर केली. माळेगाव येथे राजकिय वैमनश्यातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रविराज तावरे यांच्यावरील ३१ मेला गोळीबार झाला होता. त्या प्रकरणातील माळेगाव येथील सराईत गुन्हेगार प्रशांत पोपटराव मोरे, टॅाम उर्फ विनोद पोपटराव मोरे, राहुल उर्फ रिबेल कृष्णांत यादव यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांनव्ये (मोक्का) कारवाई करण्यात आली. 

हे ही वाचा : भाजप अस्वस्थ; गणेश गितेंसह शहाणे संजय राऊतांच्या दरबारी

या आरोपींना याआगोदरच अटक केली असून उपविभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर तपास करत आहेत. त्या पार्श्वभूमिवर प्रसारमाध्यमांशी बोलताना अप्पर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते यांनी वरिल माहिती स्पष्ट केली. मोहिते म्हणाले, ''बारामती तालुक्यात माळेगाव हे सर्वांर्थाने विकसित होत आहे. येथे नव्याने नगरपंचायत अस्तित्वात आल्याने पहिला नगराध्यक्ष अथवा नगरसेवक कोण? यामध्ये मोठी इर्शा निर्माण झाली आहे. सहाजिकच त्यामुळे गावात राजकिय वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी अनेकजण गुन्हेगारांना पाटीशी घालताना अढळून आले आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून रविराज तावरे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाकडे पाहिले जाते. या प्रतिकूल स्थितीमुळे माळेगाव सध्या खूपच संवेदनशिल बनत चालले आहे. त्या पार्श्वभूमिवर संबंधित गावात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व  संघटीत गुन्हेगारी संपविण्याच्या दृष्टीने पोलिसांनी ठोस अॅक्शन घेतली आहे. ''माळेगाव पोलिसांच्या कार्य़क्षमतेबाबत विचारणा केली असता मोहिते यांनी सांगितले की ''जनतेच्या तक्रारींची तातडीने दखल घेणे व योग्य तक्ररींवर तातडीने कार्य़वाही करणे हे काम बारामती पोलिसांनी मनापासून करावे, अन्यथा त्यांनाही यापुढे खातेनिहाय चौकशीसह योग्य त्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यावेळी बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक महेश ढवाण उपस्थित होते. 
 
पोलिस अधिक्षकांची निर्णायक भूमिका 

तावरे यांच्यावर गोळीबार झाला होता त्यावेळी खुद्द पोलिस अधिक्षक डॅा. अभिनव देखमुख (Abhinav Dekhmukh) यांनी माळेगाव येथील घटनास्थळी भेट दिली होती.  त्यांनी संबंधित आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. तसेच गावात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व  संघटीत गुन्हेगारी संपविण्याच्या दृष्टीने पोलिस ठोस अॅक्शन घेतील असे सांगितले होते. तसेच त्या कारवाईमध्ये माळेगाव पोलिसांच्या कार्यक्षमताही सुधारली जाईल असे सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी 'ऑपरेशन माळेगाव' राबविणार असल्याच्या भूमिकेला विशेष महत्व प्राप्त होते. 

हे ही वाचा : खडसे, राजू शेट्टींचे नाव कुठयं...याचा फैसला होणार

तावरे यांच्यावर गोळिबार करण्यासाठी वापरलेला गावटी कट्टा आरोपींनी नगर जिल्ह्यातून आणला होता. अर्थात या प्रकरणाचा मास्टर माईड आरोपी प्रशांत मोरे हाच असून त्यानेच रविराज तावरे यांना संपविण्यासाठी कटकारस्थान रचले होते, हे पोलिस तपासात सिद्ध झाले आहे. यापुढील काळात गावटी कट्टा विक्रत्याला पकडण्यासाठी पोलिस त्याच्या मागावर आहेत, अशी माहिती पोलिस निरिक्षक मेहश ढवाण यांनी दिली. 

Edited By - Amol Jaybhaye   

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख