बांदल जेलमध्ये गेले आणि त्यांच्या विरोधकांची पंचाईत झाली 

बांदल सध्या कायदेशीर अडचणींमध्ये अडकले असल्याने शिक्रापूर-तळेगावकरांची राजकारणातील बार्गेनिंग पावर कमी झाली की काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
Bandal went to jail and Abaraje Mandhare, Vishwas Dhamdhare lost his chance to become the chairman
Bandal went to jail and Abaraje Mandhare, Vishwas Dhamdhare lost his chance to become the chairman

शिक्रापूर (जि. पुणे)  ः शिरूर बाजार समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल सध्या विविध गुन्ह्याखाली येरवडा कारागृहात आहेत. मात्र, ते नसल्यामुळे त्यांच्या विरोधकांचे महत्त्व कमी झालेले दिसते. कारण, बांदलच राजकारणात नाहीत म्हटल्यावर त्यांच्या विरोधकांची दखल का घ्यावी?’ असा सूर निघाल्याने शिक्रापूरचे  आबाराजे मांढरे आणि तळेगाव ढमढेरे येथील विश्वासकाका ढमढेरे यांची सभापती होण्याची संधी हुकली. माजी सभापती प्रकाश पवार यांच्या गळ्यातही सभापतिपदाची माळ पडण्याचे निश्चित होते. मात्र, आंबेगाव-शिरुरकरांचा एकमेकांवरील अविश्वास प्रकाश पवारांना सभापतिपदाची हुलकावणी देऊन गेल्याचे आता काही संचालक खासगीत बोलून दाखवत आहेत. (Bandal went to jail and Abaraje Mandhare, Vishwas Dhamdhare lost his chance to become the chairman)

शिरूर बाजार समितीत राष्ट्रवादीचे १४ संचालक असून विरोधी भाजप गटाकडे केवळ दोघांचे संख्याबळ आहे. पण, वाढत्या इच्छुकांमुळे राष्ट्रवादीला सभापती निवडीसाठी बरीच धावपळ करावी लागली. शंकर जांभळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर सभापतिपदासाठी अनेकांनी आपापल्या पद्धतीने व्यूहरचना आखायला सुरूवात केली होती. दोन मतदारसंघाचा मेळ साधावा; म्हणून सुरुवातीला शिरुर-हवेलीला संधी देण्याचे ठरले. त्यात माजी उपसभापती विश्वासकाका ढमढेरे यांनी आक्रमक भूमिका घेत ‘अभी नहीं तो कभी नही..’ म्हणत तळेगावकरांच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांची समजूत काढत असतानाच शिक्रापूरचे माजी उपसरपंच आबाराजे मांढरे यांच्याही नावाचा दबाव पक्षनेतृत्वावर आला. 


मांढरे हे राष्ट्रवादीचे कट्टर युवा कार्यकर्ते. बांदलांचे पूर्वाश्रमीचे मित्र असलेले मांढरे यांनी शिक्रापुरात बांदलांना निष्प्रभ करण्याचे काम केले. आपण बांदलांना पर्याय असल्याचे दाखवून दिले. राष्ट्रवादीचे नेतेही तीच ताकद म्हणून त्यांच्याकडे पाहत होते. अर्थात, मांढरे हे शिक्रापूरपुरतेच मर्यादित राहावेत, अशी पाऊली आजपर्यंत वरिष्ठांनी टाकल्याचे दिसते. 

मंगलदास बांदल सध्या हे विविध गुन्ह्यांखाली येरवडा कारागृहात आहेत. त्यामुळे आता मांढरे यांचे तरी महत्व काय, असा प्रश्न श्रेष्ठींना कशावरून पडला नसावा, असा प्रश्न विचारल जात आहे. याच धर्तीवर तळेगाव ढमढेरे येथील संचालक विश्वासकाका ढमढेरे हेही बांदलांचे पूर्वाश्रमीचे मित्र. बांदलांच्या पत्नी रेखा बांदल या तळेगाव-ढमढेरे-विठ्ठलवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या. बांदल सध्या कायदेशीर अडचणींमध्ये अडकले असल्याने शिक्रापूर-तळेगावकरांची राजकारणातील बार्गेनिंग पावर कमी झाली की काय, असा प्रश्न विचारला जात आहे.   


मांढरेंनी ताकद दाखवली; पण....

शिक्रापूरच्या राजकारणात मंगलदास बांदलांना गावातच जर्जर करण्यासाठी राष्ट्रवादीचे आबाराजे मांढरे हे कार्ड चांगले चालले. पुढे मांढरे यांनी ग्रामपंचायतीच्या सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत बांदलांना बरोबरीत रोखले. शिवाय, पत्नी कुसुम मांढरे यांना जिल्हा परिषदेवरही पाठविले. त्यातून स्वत:चा गट कसा ताकदवान आहे, हेही दाखवून दिले. त्यामुळे कुसुम मांढरे यांना जिल्हा परिषदेत एखादे पद मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. तसेच आबाराजे मांढरे हेही बाजार समितीच्या सभापतिपदाचे दावेदारही होते. मात्र, गेल्या सव्वाचार वर्षांत त्यांना यातील काहीच मिळाले नाही. त्यात आता तर बांदले हे पुरते घायाळ झाले आहेत, त्यामुळेच मांढरे यांना मानाचे पान मिळाले नसल्याचे बोलले जात आहे.

मुंबईवारीने दुसऱ्या वेळीची संधी हुकली  

शंकर जांभळकर यांनी सभापतिपदाच्या एक वर्षाच्या कार्यकाळात बरीच कामे केली.तोट्यातील बाजार समिती नफ्यात आणून दाखवली. बाजार समितीच्या आत्तापर्यंत झालेल्या विकासाचा आढावा घेणारे एक पुस्तक त्यांनी काढले. त्याचे प्रकाशन मुंबईत केले. त्या प्रकाशन सोहळ्यासाठी काही मोजकेच संचालक मुंबईत नेल्याचा फटका जांभळकरांना बसल्याचे काही संचालक खासगीत सांगतात. कारण, सभापतिपदासाठी अनेक जण इच्छूक होते, त्यावेळी सर्वमान्य नाव म्हणून जांभळकरांनाच सर्वांची पसंती होती. पुढे राजकारण बदलले आणि ज्येष्ठ संचालक असलेल्या अ‍ॅड. वसंतराव कोरेकरांना संधी मिळाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com