विद्यार्थी सेनेपासून साथ देणाऱ्या कार्यकर्त्याला राज ठाकरेंनी बनविले मनसेचा नेता

त्यावेळी दिलीप धोत्रे यांनी सोलापूर जिल्ह्यातून प्रथम शिवसेना सोडून राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला होता.
Appointment of Dilip Dhotre as MNS leader
Appointment of Dilip Dhotre as MNS leader

पंढरपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते धोत्रे यांना नियुक्तीचे पत्र देवून सत्कार करण्यात आला. विद्यार्थी सेनेचा शाखा अध्यक्ष ते पक्षाचा नेता असा धोत्रे यांचा प्रवास अनेकांना अचंबित करणारा आहे. (Appointment of Dilip Dhotre as MNS leader)

राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन दिलीप धोत्रे हे 1992 मध्ये पंढरपूर काॅलजेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाच्या निवडणुकीत त्यांचा नेहमी मोठा सहभाग होता. दिलीप धोत्रे यांच्या कामाची दखल घेऊन राज ठाकरे यांनी त्यावेळीच त्यांच्यावर विद्यार्थी सेनेची जबाबदारी टाकली होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी दिलीप धोत्रे यांनी सोलापूर जिल्ह्यातून प्रथम शिवसेना सोडून राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला होता.

सोलापूर जिल्ह्यातील मनसेच्या वाढीत दिलीप धोत्रे यांचा सिंहाचा मोठा वाटा आहे. जिल्हा संघटक, शाॅडो सहकारमंत्री, प्रदेश सरचिटणीस अशी महत्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. त्यानंतर त्यांच्याकडे पक्षाने नेतेपद सोपविल आहे. मुंबईत आज (ता. ९ ऑगस्ट) कृष्णकुंज या निवासस्थानी दिलीप धोत्रे यांना राज ठाकरे यांनी नेतेपदाच्या नियुक्तीचे पत्र देवून सन्मान केला. या वेळी पक्षाचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, सरचिटणीस संतोष नागरगोजे आदी उपस्थित होते.

कोरोना काळात मागील दीड वर्षापासून दिलीप धोत्रे यांनी अनेक गोरगरीब व मजूरांना अन्नाधान्य, कपडे मोफत देऊन मोठी मदत केली आहे. अडचणीच्या काळात अनेकांना आर्थिक मदत दिली आहे. कोरोना रुग्णांसाठी हाॅस्पिटल देखील सुरु केले आहे. त्याद्वारे रुग्णांवर माफक दरात उपचार केले आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन  राज ठाकरे यांनी त्यांना पक्षात मोठे स्थान दिले आहे. त्यांच्या निवडीनंतर सोलापूर जिल्ह्यातील पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com