‘घोडगंगा’च्या उभारणीत रावसाहेबदादांना साथ देणाऱ्यांस अशोक पवारांनी दिली कारखान्यावर संधी 

सामाजिक कार्याची जाणीव ठेवून त्यांचीनिवड केली आहे.
Appointment of Dharamchand Fulfagar as Expert Director of Ghodganga Sugar Factory
Appointment of Dharamchand Fulfagar as Expert Director of Ghodganga Sugar Factory

शिरूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी येथील सराफ व्यावसायिक धरमचंद भवरीलाल फुलफगर यांची निवड करण्यात आली आहे. (Appointment of Dharamchand Fulfagar as Expert Director of Ghodganga Sugar Factory)

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार ॲड अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत सर्वानुमते  फुलफगर यांची तज्ज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आली. कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांच्या सहीचे नियुक्ती पत्र आज कारखान्याचे उपाध्यक्ष ॲड. रंगनाथ थोरात यांच्या हस्ते फुलफगर यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 

या वेळी गोडीजी पार्श्‍वनाथ जैन टेम्पल ट्रस्टचे अध्यक्ष सतीश धाडिवाल, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, संचालक शिरीष बरमेचा, प्रकाश बोरा, प्रकाश बाफणा, राष्ट्रवादी कॉंग्रेस लिगल सेलचे प्रदेश सरचिटणीस ॲड. शिरीष लोळगे, तालुकाध्यक्ष ॲड. प्रदीप बारवकर, शहर अध्यक्ष डॉ.रवींद्र खांडरे, ॲड. संजय ढमढेरे, देवल शहा, सुनील बोरा, सुनील धाडिवाल, देवेंद्र फुलफगर आदी उपस्थित होते.      

धरमचंद फुलफगर हे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक असून, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यातील विविध धार्मिक, सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. अनेक समजोपयोगी व शैक्षणिक उपक्रमांना त्यांनी वेळोवेळी मोठे आर्थिक पाठबळ दिले आहे. कोरोना काळातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून, त्यांच्या सामाजिक दायित्वाची दखल घेऊन ‘सकाळ'ने त्यांचा गौरव केला आहे. 

घोडगंगा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार रावसाहेबदादा पवार व धरमचंद फुलफगर यांचे वडील भवरीलाल फुलफगर हे अत्यंत जवळचे स्नेही होते. रावसाहेबदादांच्या मृत्यूनंतर कारखान्याची धुरा हाती घेतल्यानंतर आमदार अशोक पवार यांनी कारखान्याच्या उभारणीत दादांना मनापासून सहकार्य करणाऱ्या व्यक्ती, घराणे व संस्थांची आठवण ठेवली. धरमचंद फुलफगर यांनी केलेल्या सामाजिक कार्याची जाणीव ठेवून त्यांची कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी निवड केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com