बारामतीत आणखी सात दिवस कडक लॉकडाऊन 

या लॉकडाऊनच्या काळात भाजीपाला व फळे विक्रीसही परवानगी नाकारण्यात आली आहे.
Another seven days of severe lockdown in Baramati
Another seven days of severe lockdown in Baramati

बारामती : बारामतीतील (Baramati) कडक लॉकडाउनचा (Lockdown) कालावधी आणखी सात दिवसांनी (ता. 18 मे मध्यरात्रीपर्यंत) वाढविण्यात येत असल्याची घोषणा उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे (Dadasaheb Kamble) यांनी आज (ता. ११ मे) केली. (Another seven days of severe lockdown in Baramati)

बारामतीमधील कडक लॉकडाऊनची मुदत आज संपत होती. त्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत विविध पदाधिकारी, व्यापारी व इतर मान्यवरांची मते ऐकून घेतल्यानंतर दादासाहेब कांबळे यांनी कडक लॉकडाऊन आठवड्यासाठी वाढवत असल्याचे जाहीर केले. 

या लॉकडाऊनच्या काळात किराणा घरपोच देण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, किराणा विक्रीच्या दुकानांत जाऊन ग्राहकांना किराणा सामानाची खरेदी करता येणार नाही, असेही कांबळे यांनी स्पष्ट केले. दूध विक्री ही सकाळी सात ते नऊ या वेळेत सुरु राहणार असून इतर सर्व निर्बंध मागील आठवड्याप्रमाणेच कायम राहणार आहेत. औषध दुकाने, रुग्णालय व कोविडपूरक सेवा मात्र कायम सुरळीतपणे सुरु राहणार आहेत. भाजीपाला व फळे विक्रीसही परवानगी नाकारण्यात आली आहे. 

हेही वाचा : नातेवाइकांनी फोडलेला हंबरडा ऐकून अंत्यसंस्काराची तयारी चालवलेल्या आजीने डोळे उघडले
 
बारामतीतील कोरोना पॉझिटीव्हीटीचा दर 40 टक्क्यांवरुन 27 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मात्र, हा दर दहा टक्क्यांहून कमी होण्याची आवश्यकता कांबळे यांनी बोलून दाखवली. या प्रसंगी मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी बारामती नगरपालिका हद्दीतील, तर गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी बारामती तालुका पंचायत समिती हद्दीतील परिस्थितीचा आढावा सादर केला.

 
गेल्या आठवड्यात बारामतीकरांनी कडक निर्बंध असतानाही नियम पाळून सहकार्य केले आहे. या मुळे रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. आगामी आठवडा कडक निर्बंध पाळले तर रुग्णवाढीचे प्रमाण निश्चित खाली येईल, असा विश्वास या प्रसंगी अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी व्यक्त केला. या संदर्भातील सविस्तर सूचना उपविभागीय अधिकारी काढणार असून ती नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिध्द केली जाणार आहे. या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांनी  लॉकडाऊन आणि कोरोनाबाबतची आपली मते व्यक्त केली. 

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती नीता फरांदे, तहसिलदार विजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे आदी या प्रसंगी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com