शिंदवणेत राष्ट्रवादीच्या अण्णासाहेब महाडीक गटाची हॅट्‌ट्रीक 

ग्रामपंचायतीवर मागील दहा वर्षांपासून अण्णासाहेब महाडीक गटाची सत्ता आहे.
Annasaheb Mahadik group's  third time power on Shindwane Gram Panchayat
Annasaheb Mahadik group's third time power on Shindwane Gram Panchayat

उरुळी कांचन (जि. पुणे) : पूर्व हवेलीमधील बहुचर्चित ग्रामपंचायतीची सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्यात माजी सरपंच अण्णासाहेब महाडीक यांना यश आले आहे. अण्णासाहेब महाडीक यांच्या नेतृत्वाखालील संत यादवबाबा पॅनेलने तेरापैकी दहा जिंकत विरोधी शिवछत्रपती ग्रामविकास पॅनेलचा दारूण पराभव केला. 

अण्णासाहेब महाडीक यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी एकत्र आलेल्या शिंदवणे गावचे पोपट महाडिक (पोलिस पाटील), सचिन मचाले, जगदिश महाडिक, मुरलीधर महाडिक व हडपसरचे शिवसेना शाखाप्रमुख रामभाऊ महाडिक यांच्या नेतृत्वाखालील शिवछत्रपती ग्रामविकास पॅनेलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. सागर खेडेकर यांच्या जय मल्हार विकास आघाडीने दोन जागी विजय मिळवला. 

शिंदवणे ही ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या संवेदनाशिल असून तेरा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीवर मागील दहा वर्षांपासून अण्णासाहेब महाडीक गटाची सत्ता आहे. अण्णासाहेब महाडीक यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी पोपट महाडिक (पोलिस पाटील), सचिन मचाले, जगदिश महाडिक, मुरलीधर महाडिक व हडपसरचे शिवसेना शाखाप्रमुख रामभाऊ महाडिक यांच्या नेतृत्वाखालील शिवछत्रपती ग्रामविकास पॅनेलने रान उठवले होते. दोन्ही पॅनेलकडून सत्तेसाठी वारेमाप खर्चही करण्यात आला होता. यामुळे या ग्रामपंचायतीची सत्ता अण्णा महाडीक राखणार की विरोधक सत्ता हिसकावून घेणार, याकडे संपूर्ण पूर्व हवेलीचे लक्ष लागून राहिले होते. मात्र यात सलग तिसऱ्यांदा ग्रामपंचायतीची सत्ता आपल्यात हाती राखण्यात अण्णासाहेब महाडीक यशस्वी ठरले आहेत. 

दरम्यान, अण्णासाहेब महाडीक यांची सत्ता राखण्यासाठी हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती वैशाली महाडीक, माजी सरपंच गणेश महाडीक व त्यांचे सहकारी प्रयत्न करत होते. अण्णासाहेब महाडीक राष्ट्रवादीचे पदाधिकारी असून, त्यांनी सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. 

प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : प्रभाग 1- भाग्यश्री विनोद शिंदे, लता अशोक माने, ज्योती दत्तात्रेय महाडिक (संत यादवबाबा पॅनेल). प्रभाग2 - योगेश चंद्रकांत कुलाळ, प्रमिला कचरू शितोळे (संत यादवबाबा पॅनेल). प्रभाग 3- संगिता माणिक महाडिक (शिवछत्रपती ग्रामविकास पॅनेल), सारिका दिनानाथ महाडिक (संत यादवबाबा पॅनेल). प्रभाग 4 - गणेश भाऊसाहेब महाडिक, मनीषा अण्णा महाडिक, शोभा आबासाहेब महाडिक (संत यादवबाबा पॅनेल). प्रभाग 5- सागर अशोक खेडेकर, ओंकार बाजीराव मांढरे (मल्हार विकास आघाडी) व कमल माणिक शिंदे (संत यादवबाबा पॅनेल). 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com