आम्ही चिकन, मासवडी देतोय; तुम्ही मटन अन्‌ आंबरस द्या; पण राजकारण करू नका!

उणिवा समोर आणून दिल्या, हा काय आमचा गुन्हा आहे का?
Allegations of two groups against each other from the facilities on Somatwadi Kovid Center
Allegations of two groups against each other from the facilities on Somatwadi Kovid Center

जुन्नर (जि. पुणे) : जुन्नर (Junnar) तालुक्यातील सोमतवाडी (Somatwadi) येथील कोरोना सेंटरमधील ( Corona Center) रुग्णांसाठी आम्ही दररोज दोन अंडी देतोय, त्यांनी चार द्यावीत. आम्ही चिकन देतोय, त्यांनी मटण द्यावे; आम्ही मासवडी देतोय, त्यांनी आंबरस द्यावा. आम्ही काम करतोय, त्यांनीही करावे; पण उगीच टिकाटिपणी करू नये. ही राजकरण करायची वेळ नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल लांडे यांनी आपल्या विरोधकांना सुनावले. (Allegations of two groups against each other from the facilities on Somatwadi Kovid Center)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात रुग्णसंख्या वाढत आहे. या रुग्णांना जवळचे व सोयीचे व्हावे, यासाठी सोमतवाडी येथे  शासकीय कोविड सेंटर  सुरू करण्यात आले. त्यासाठी निरगुडे-पाडळी गटाचे जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी आग्रह धरला होता. सोमतवाडीच्या शासकीय कन्या आश्रम शाळेच्या इमारतीत एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सेंटर सुरू झाले आहे.

हे केंद्र सुरू झाल्यानंतर गेल्या काही दिवसांत परस्परविरोधी कार्यकर्ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागल्याने प्रशासनाने डोक्याला हात लावून घेतला आहे. कोविड सेंटरमध्ये पाणी, वीज व स्वच्छता याविषयी असणाऱ्या त्रुटी व समस्या सामाजिक कार्यकर्ते दत्ता गवारी यांनी वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. समाज माध्यमातूनदेखील यावर चर्चा झाली. वादळात वीज गेल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले, तर वादळ येणार माहिती असूनही पाण्याच्या टाक्या भरून ठेवल्या नसल्याने पाणीप्रश्न निर्माण झाल्याचे गवारी यांनी सांगितले.

कोवीड सेंटर चालविण्याची जबाबदारी सरकारची आहे. जेवण, नाष्टा, निवास, औषधे, डॉक्टर, स्वच्छ्ता, रुग्ण वाहतूक पूर्णपणे मोफत आहे. पाण्यासाठी चाळीस हजार लिटरच्या दोन टाक्या आहेत. पाण्याची जबाबदारी शाळा प्रशासनाची आहे. शाळा व्यवस्थापन समितीने फिल्टर खरेदी केला असून तो फिल्टर चालू बंद असण्यावरून उलट सुलट चर्चेला उधाण आले होते. 

बारव पाडळीचे उपसरपंच राजू कारभळ, रणझुंजार फाउंडेशनचे संस्थापक अशोक बोचरे, माजी उपसरपंच राजू डुंबरे, वरसुबाई मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्ता गवारी, निखिल पठारे, विकास राऊत यांनी याबाबत विचारणा केली असता त्यांच्यावर चमकोगिरी करत असल्याचा आरोप करण्यात आला. माजी आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमातून रुग्णांना अंडी शिजवून देणे, पेशंटला बेड मिळून देणे अशी कामे हा मित्र परिवार करीत आहे. तुम्ही करत असलेल्या कामाला आम्ही विरोध करीत नाहीत तर उणिवा समोर आणून दिल्या, हा काय आमचा गुन्हा आहे का? असा प्रश्न गवारी यांनी केला आहे.

कोविड सेंटरमधील कचरा कोठे टाकायचा, या प्रश्नावरून तो एक मेपासून उचलून नेला जात नव्हता. हा कचरा प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग तसेच बकेटमध्ये भरून साचून राहिला होता. नगर पालिकेच्या कचरा डेपोत टाकण्यास परवानगी मिळाल्याने हा प्रश्न सुटला असल्याचे राजू कारभळ यांनी सांगितले. प्रशासन व लोकप्रतिनिधींना सांगण्यापेक्षा स्वतः स्वच्छता करा या कमेंट्सला सकारात्मक घेऊन आम्ही व राधेश्याम सेवा संस्थेच्या स्वयंसेवकांनी कोविड सेंटरची स्वच्छता केली असल्याचे गवारी यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com