मद्यपींसाठी खूशखबर : आता विदेशी दारूसह देशीही मिळणार घरपोच

दारू विक्रेत्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक दुकानावर लावायचा आहे.
Alcoholics will now get domestic and foreign liquor at home
Alcoholics will now get domestic and foreign liquor at home

पुणे : मद्यपींसाठी खूशखबर असून त्यांना आता घरपोच दारू मिळणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी त्याबाबतचा आदेश प्रसिद्ध केला आहेत. या आदेशानुसार वाईन, बिअर, व्हिस्की, रमसह देशी दारूही आता घरपोच देण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मद्याची वाहतूक करताना अडचण येणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता वाईन शॉपमधूनही ग्राहकांना घरपोच मद्य मिळणार आहे. 

होम डिलिव्हरीच्या माध्यमातून मद्यविक्री करण्याचे आदेश राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ चे आदेश काढताना दिले आहेत. पण, उत्पादन शुल्क विभागाने तसा आदेश दिलेला नव्हता. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी होम डिलिव्हरी सुरू नव्हती. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी आदेश प्रसिद्ध केल्यामुळे आता वाईन शॉप, बिअर शॉपी (एफएल २), बिअर बार (फॉर्म ई), वाईन शॉपी (फॉर्म ई २), देशा दारू (सीएल ३) ग्राहकांना घरबसल्या मिळणार आहे. ही घरपोच सेवा एमआरपीनुसार करण्याची सूचनाही सरकारने केली आहे. बारमधून यापूर्वीच होम डिलिव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

दारू विक्रेत्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक दुकानावर लावायचा आहे, ग्राहकांनी त्यावर संपर्क साधून आपली ऑर्डर नोंदवायची आहे. व्हॉटस अपवर नोंदणी केली तरी, ग्राहकांना होम डिलिव्हरी मिळणार आहे. मद्यविक्रीसाठी दुकान उघडायचे नाही आणि दुकानात जाऊन मद्यखरेदी करायची नाही, अशी ताकीदही सरकारने दिलेली आहे.

दारू विक्रेत्यांनी त्यांच्याकडील कामगारांची नावनोंदणी उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांकडे नोंदवावी. त्या नोंदविलेल्या कामगाराच्या माध्यमातूनच ग्राहकांना घरपोच दारू पुरवली जाणार आहे. त्यासाठी संबंधित मद्यपीकडे मद्य सेवनाचा परवाना असणे आवश्यक आहे. त्यासाठी वन डे लायसन (एक दिवसांचा मद्य सेवनाचा परवाना) पाच रुपयांत घ्यावे लागणार आहे. संबंधित वाईन शॉपमधूनही डे लायसन ग्राहकांना मिळेल. पुण्यात घरपोच मद्यविक्री राज्य सरकारच्या आदेशानुसार अनेक ठिकाणी सुरू झाली आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे यांनी दिली. 

काही दुकानदारांनी मंगळवारी घरपोच डिलिव्हरीसाठी वाईनशॉप उघडल्यावर तेथे ग्राहकांची गर्दी झाली होती. मात्र, पार्सलही मिळणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांनी काढता पाय घेतला, तर अनेक दुकानदारांना गर्दीमुळे दुकाने बंद करावी लागली. 

दरम्यान, घरपोच मद्य पोचविण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी सशुल्क पोलिस बंदोबस्त मिळावा, अशी सूचना वाईन शॉप असोसिएशनतर्फे अजय देशमुख यांच्याकडून करण्यात आली आहे. गृहरक्षक दलाचे दोन जवानही एका दुकानावर बंदोबस्तासाठी पुरेसे ठरतील. संबंधित दुकानदार त्याचे शुल्क  पोलिस आयुक्त कार्यालयात जमा करतील, असेही त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com