अजितदादा म्हणतात, इकडचे लोक तिकडे घ्यायचं नाही, असं आमचं ठरलयं...

शिवसेनेच्या दबावानंतर महेश कोठे यांचा प्रवेश लांबणीवर गेला.
Ajit Pawar
Ajit Pawar

पुणे : सोलापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे आणि त्यांचे समर्थक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार होते. मात्र, अचानक हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला. कोठे यांच्या काही समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, शिवसेनेच्या दबावानंतर महेश कोठे यांचा प्रवेश लांबणीवर गेला.

कोठे यांच्या बद्दल उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, महाविकास आघाडीत कार्यक्रम ठरवत असताना इकडचे लोक तिकडे घ्यायचे नाहीत, असे ठरलेले आहे. मात्र, कोणी कोठे जावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महेश कोठे यांच्याविषयी मला जास्त काही माहिती नाही. अशी प्रतिक्रिया पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कोठेंचा शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश होणार होता. खुद्द पवार यांनी याबाबत घोषणा केली होती. प्रत्यक्षात कोठे यांच्याच कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला. शिवसेनेच्या दबावानंतर हा प्रवेश रखडला असल्याचे बोलले जात आहे. महेश कोठे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले होते. कोठे राष्ट्रवादीत गेले तर जवळपास त्यांच्यासोबत असलेले 18 नगरसेवक राष्ट्रवादीत जाण्याची शिवसेनेला भीती होती आणि त्यातून सोलापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते पद शिवसेनेच्या हातून जाण्याची शक्यता होती. 

कोठेंच्या प्रवेशावर शरद पवार काय म्हणाले होते? 

पवार यांनी या प्रवेशाबाबत काही ट्विटपण केले. त्यात ते म्हणतात, सोलापूर शहर स्वातंत्र्य चळवळीचे शहर होते. अन्याय-अत्याचारांविरोधी लढणाऱ्या लोकांचे हे शहर. सोलापूर शहराची ही जुनी घडी पुन्हा घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. शहरातील रखडलेले अनेक प्रश्न पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपण एकत्रित काम करू यासाठी आम्हा साऱ्यांचा पाठिंबा तुम्हाला नक्की मिळेल. सोलापूर शहर हे विविधतेने नटलेले शहर आहे. या शहराचा विचार हा गांधी, नेहरू, इंदिरा गांधी यांच्या विचारांचा होता.

मात्र मध्यंतरी भाजपाच्या विचाराने प्रेरित वर्गामुळे सोलापूरचा चेहरा बदलला. हे चित्र पुन्हा बदलण्यासाठी महेश कोठे तसेच अन्य सहकाऱ्यांनी लक्ष घातले आहे. सोलापूर शहर स्वातंत्र्य चळवळीचे शहर होते. अन्याय-अत्याचारांविरोधी लढणाऱ्या लोकांचे हे शहर. सोलापूर शहराची ही जुनी घडी पुन्हा घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. शहरातील रखडलेले अनेक प्रश्न पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपण एकत्रित काम करू यासाठी आम्हा साऱ्यांचा पाठिंबा तुम्हाला नक्की मिळेल. या साऱ्या ट्विटमध्ये पवार यांनी कोठे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, असा उल्लेख नव्हता.  

2019 च्या विधानसभेत कोठे यांना शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करून वंचित कडून निवडणूक लढवली होती. त्यांची तेव्हा सेनेने हकालपट्टी केली होती. त्यानंतर ते पुन्हा शिवसेनेत कार्यरत झाले होते. त्यामुळे महेश कोठे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला शिवसेनेचा विरोध केला. राष्ट्रवादीने या आधीही पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक पक्षात घेतले होते. तेव्हाही सेनेने असाच विरोध करून हे नगरसेवक शिवसेनेतच असल्याचे जाहीर करायला लावले होते. काॅंग्रेसचे भिवंडीतील नगरसेवक राष्ट्रवादीत गेले होते. त्यानंतर काॅंग्रेसमधील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. पण शिवसेनेने झालेले आणि संभाव्या प्रवेशही रोखले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com