अजित पवारांचा खासदार संजय राऊत यांना इशारा 

कॉंग्रेसमध्ये सोनिया गांधी यांना, शिवसेनेत उध्दव ठाकरे यांना तर राष्ट्रवादीत शरद पवार यांना कोणाला मंत्री करायचे याचा अधिकार आहे.
Ajit Pawar.jpg
Ajit Pawar.jpg

बारामती : राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करु नये, अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संजय राऊत यांना इशारा दिला आहे.

अनिल देशमुख यांना अपघाताने गृहमंत्रीपद दिल्याचे विधान संजय राऊत यांनी केल्यानंतर आज बारामतीत अजित पवार यांना पत्रकारांनी या बाबत विचारणा केल्यानंतर पवार यांनी रोखठोक शैलीत राऊत यांना इशारा दिला.

कॉंग्रेसमध्ये सोनिया गांधी यांना, शिवसेनेत उध्दव ठाकरे यांना तर राष्ट्रवादीत शरद पवार यांना कोणाला मंत्री करायचे याचा अधिकार आहे. त्या मुळे ते या बाबतचा निर्णय घेत असतात. महाविकास आघाडीबद्दल त्रयस्थाने वक्तव्य करणे समजू शकतो, पण घटक असलेल्यांनी अशी विधाने करणे योग्य नाही, अशा शब्दात पवार यांनी या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली. 

दिपाली चव्हाण यांची आत्महत्या अत्यंत दुर्देवी घटना आहे, प्रत्येक ठिकाणी काम करताना आपल्या सहका-यांचा मान सन्मान ठेवूनच काम करायला हवे, या प्रकरणात पोलिस योग्य तो तपास करुन यातील तथ्य शोधून काढतील. यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर सरकार कडक कारवाई करेल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

नागरिकांनी शिस्तीचे पालन करायला हवे, येत्या 2 एप्रिल पर्यंत जर रुग्ण संख्या कमी झाली नाही तर नाईलाजाने काही कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही पवार यांनी आज बारामतीत अधिका-यांच्या बैठकीत बोलताना दिला आहे. 

बारामतीतील कोरोनाच्या स्थितीबाबत पवार यांनी वरिष्ठ अधिका-यांकडून सविस्तर माहिती घेतली. शासनाने जे निर्बंध घालून दिलेले आहेत, त्यांचे पालन प्रशासन स्तरावर कडकपणे करण्यासंदर्भात त्यांनी आज अधिका-यांना सूचना दिल्या. 

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतानाही अजित पवार यांनी मास्कचा वापर अजूनही लोक करताना दिसत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन आपल्या स्तरावर वेगाने काम करते आहे, मात्र नागरिकांनी काळजी घेण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com