आमदार भारत भालकेंच्या वारसदाराबाबत अजित पवार म्हणाले... 

आमदार भारत भालकेंची अपूर्ण कामे थोरल्या पवारसाहेबांनी व उपमुख्यमंत्री अजितदादांनी पूर्ण करावीत.
Ajit Pawar said about the successor of MLA Bharat Bhalke .
Ajit Pawar said about the successor of MLA Bharat Bhalke .

पंढरपूर/मंगळवेढा : "आमदार भारत भालके यांच्या अकाली जाण्याने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ पोरका झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा धडाडीचा कार्यकर्ता आणि माझा जवळचा सहकारी गमावल्याचं दुःख आहे. त्यांचं अपूर्ण राहिलेलं मतदारसंघातील कार्य पूर्ण करण्याचा मी शब्द देतो,' अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

दरम्यान, आमदार भारत भालके यांच्या वारसदाराबाबत माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या व्यक्तव्यासंदर्भात अजित पवार म्हणाले की, ही बोलण्याची वेळ नाही. मी बोलत नाही तर वेळ आल्यावर करून दाखवतो,' असे सांगून भालके यांच्या वारसदाराबाबत सूचक विधान केले. 

आमदार भालके यांच्या पार्थिवावर सरकोली येथे शनिवारी (ता. 28 नोव्हेंबर) दुपारी चारच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी झालेल्या शोकसभेत बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आपण पालकत्व स्वीकारत असल्याचेही जाहीर केले. 

पवार म्हणाले की, शरद पवारांना दैवत मानून काम करताना आमदार भालकेंना मतदारसंघातील जनतेनी ताकद दिली. जनतेशी नाळ जोडलेले ते लोकनेता होते. एखाद्या कामाबाबत पाठपुरावा करताना "मला माहीत नाही, हे काम झालेच पाहिजे' ही भूमिका घेत कामाचा शेवट यशस्वी होईपर्यंत पाठपुरावा करणारे ते नेते होते. भालके कुटुंबाला सावरण्यासाठी पांडुरंग आणि रुक्‍मिणीने ताकद द्यावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 


काय म्हणाले धनंजय महाडिक 

आमदार भारत भालकेंची अपूर्ण कामे थोरल्या पवारसाहेबांनी व उपमुख्यमंत्री अजितदादांनी पूर्ण करावीत. त्यांचे पुत्र भगिरथ भालकेंना आमदार भालकेंच्या रुपात बघून यापुढे सहकार्य करावे, असे व्यक्तव्य कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक यांनी शोकसभेत केले. महाडीक यांच्या भाषणातील मुद्द्याचा धागा पकडून अजित पवार यांनी "मी बोलत नाही, तर करुन दाखवतो,' असं आमदार भालकेंच्या वारसदाराबाबत सूचक व्यक्त केलं. 

कोरोनाचे संकट मोठं आहे. कोरोनामुळे अनेक जीवाभावाची माणसं सोडून गेली आहेत. अशा संकट काळात लोकांनीदेखील काळजी घ्यावी, असेही पवार यांनी आवाहन केले. 

संपूर्ण​ सोलापूर जिल्ह्याचे नुकसान 

आमदार भारत भालकेंच्या निधनामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. सभागृहात ते पंढरपूर-मंगळवेढयाचे प्रश्न पोटतिडकीने मांडत असतं. त्यांच्या रांगड्या वक्तृत्वामुळे आणि आक्रमक भाषण शैलीमुळे अल्पवाधीत त्यांनी अनेकांना आपलंस केलं होतं. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची विठ्ठलाने ताकद द्यावी, अशी भावना सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केली. 


पंढरपूरचं भरून न येणारं नुकसान झालं 

आमदार भारत भालकेंनी शिंदे कुटुंबीयांवर खूप प्रेम केलं. त्यांनी नेहमीच मला वडिलकीच्या नात्याने सल्ला दिला. सभागृहातील एक प्रामाणिक आणि सच्चा सहकारी गमावल्याचं दुःख आहे. सोलापूर जिल्ह्याचे आणि पंढरपूरचं झालेलं राजकीय नुकसान कधीही भरुन न येणारं आहे, अशा भावना आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केल्या. 

आमच्यात मनभेद कधीच नव्हता 

आमदार प्रशांत परिचारक म्हणाले, "राजकारणात आम्ही तीन वेळा एकमेकांच्या विरोधात लढलो. पण आमच्यात कधीही मनभेद नव्हते. सहकारी संस्थांच्या वाटचालीत त्यांचे योगदान मोठं आहे. या पुढच्या काळात सर्व सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.' 

या वेळी माजी आमदार दीपक साळुंखे, आमदार संजय शिंदे, यशवंत माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनीही श्रद्धांजली वाहिली. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com