डिपॉझिट जप्त झालेल्यांबाबत काय बोलणार?   - Ajit Pawar criticism of Gopichand Padalkar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

डिपॉझिट जप्त झालेल्यांबाबत काय बोलणार?  

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 20 जून 2021

त्यांची योग्यता बारामतीकरांनी मागील विधानसभा निवडणुकीतच ओळखली आहे.

पुणे : मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. बारामतीकरांनी ज्यांचे डिपॉझिट जप्त केले आहे, त्यांच्याबद्दल काय बोलणार? त्यांची योग्यता बारामतीकरांनी मागील विधानसभा निवडणुकीतच ओळखली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर बोचरी टीका केली. (Ajit Pawar criticism of Gopichand Padalkar)

विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी कोरोना उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीनंतर पवार बोलत होते. शनिवारी बारामती दौऱ्यावर असताना गोपीचंद पडळकर यांनी बारामतीच्या जनतेने पवारांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे. तसेच, पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार शाहू-फुले-आंबेडकर यांच्या वारसदारांच्या संवैधानिक हक्कावर गदा आणण्याचे काम करत आहे, अशी टीका केली होती. या संदर्भात पवार म्हणाले, ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यांच्याबद्दल काय बोलणार? त्यांची योग्यता बारामतीकरांनी मागील विधानसभा निवडणुकीतच ओळखली आहे.

हे ही वाचा : सारथी संस्थेला स्वायत्तता; मराठा समाजासाठी विविध सवलती

नीलेश राणे यांच्यावर टीका 

उस्मानाबाद येथे सलामी नाकारल्यावरून नीलेश राणे यांनी पवार त्यांच्यावर टीका केली. त्यावर पाऊस असल्यामुळे सलामी नाकारली. ज्यांना काही उद्योग नाही. टीका कोण करत आहे, ती व्यक्ती कोण आहे, त्यावर टीकेला महत्त्व असते. त्याच्या टीकेला कोण लक्ष देतेय, अशा शब्दांत पवार यांनी नीलेश राणे यांना उत्तर दिले.
   
प्रत्येकाला पक्ष वाढविण्याची मुभा 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे वक्तव्य केले होते. या संदर्भात पवार म्हणाले, निवडणुका लागतील त्यावेळी कोणाकोणाची आघाडी आणि युती आहे, हे व्यवस्थित सांगेन. प्रत्येक राजकीय पक्षाला स्वत:चा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारचे कामकाज 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' नुसार चांगले सुरू आहे. 

हे ही वाचा : अजितदादांना पिंपरी-चिंचवडमध्ये चितपट करु: आमदार जगतापांचे खुले आव्हान

पीककर्ज न देणाऱ्या बॅंकांवर कारवाई 

शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याबाबत राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बॅंकांना सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे देऊनही पीककर्ज न दिल्यास संबंधित बॅंकांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे पवार यांनी सांगितले आहे. 
 
तर सोसायट्यांमध्येही लसीकरण 

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात यावे, ही बाब पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेलाही मान्य आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर लसी प्राप्त झाल्यास सोसायट्यांमध्ये लसीकरण करण्यात येईल, असेही पवार म्हणाले. सध्या कोरोना योद्धे आणि दिव्यांगांना लसीकरण करीत आहोत, असे पवार यांनी स्पष्ट केले.  
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख