रस्त्यांबाबत अजित पवारांनी अधिका-यांना सुनावले खडे बोल....

रस्त्याबाबत सर्वच स्तरातून नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज अधिका-यांची झाडाझडती घेतली. निधी उपलब्ध करुन देऊनही वेळेत कामे सुरु का होत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. दिवाळीपर्यंत सर्व रस्त्यांची कामे तातडीने सुरु करुन पूर्ण करा, असे आदेशच त्यांनी दिले.
Ajit Pawar
Ajit Pawar

बारामती : शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरुन रस्ते दुरुस्ती करण्याच्या सूचना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेच्या अधिका-यांना दिल्या. अनेकदा सूचना देऊनही ही कामे सुरु होत नसल्याबद्दल आज अजित पवार यांनी आपल्या शैलीत अधिका-यांना खडे बोल सुनावले. 

रस्त्याबाबत सर्वच स्तरातून नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज अधिका-यांची झाडाझडती घेतली. निधी उपलब्ध करुन देऊनही वेळेत कामे सुरु का होत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. दिवाळीपर्यंत सर्व रस्त्यांची कामे तातडीने सुरु करुन पूर्ण करा, असे आदेशच त्यांनी दिले. 

बारामती नगरपालिका हद्दीतील रस्ते नगरपालिकेने, जिल्हा परिषद हद्दीतील रस्ते जिल्हापरिषदेने व सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या हद्दीतील रस्त्यांची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे पवार यांनी सांगितले. 

दरम्यान बारामती नगरपालिकेतील डांबरीकरण व कॉंक्रीटीकरणाच्या 82 कामांच्या तीन निविदांना मंजूरी मिळाली असून या सर्व कामांच्या वर्क ऑर्डर संबंधित कंत्राटदारांना दिलेल्या असून ही कामे काही ठिकाणी सुरु झाली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांनी दिली. जवळपास 14 कोटी रुपयांची ही सर्व कामे आहेत. 

दरम्यान बारामती शहरासह तालुक्यातही जेथे रस्त्यांची पावसाने व इतर कारणांनी दुरवस्था झालेली आहे, त्या रस्त्यांची डागडुजीही अजित पवार यांच्या सूचनेनुसार तातडीने सुरु करणार असल्याचेही बारभाई म्हणाले. बारामती तालुक्यातील विविध ठिकाणच्या पूलांचीही मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीने हानी झाली आहे. त्याची कामेही प्रस्तावित करण्यात आली असून तीही सुरु केली जाणार आहेत. 

Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com