एका दिवसात 200 स्वॅब घेणाऱ्या आरतीचे कौतुक वाटते : सुळे 

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही या कोरोना महामारीविरोधातील लढाईत पोलिस, डॉक्‍टर आणि नर्स हे प्रसंगी आपला जीव धोक्‍यात घालून काम करत आहेत. त्यांच्या या कामाबद्दल सरकार आणि समाजाच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. या लढाईत राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आपल्या परीने योगदान देत आहेत.
Aarti who takes 200 swabs in one day is appreciated by Supriya Sule
Aarti who takes 200 swabs in one day is appreciated by Supriya Sule

पुणे : "सोलापूर महानगरपालिकेत सहायक वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असणारी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसची शहराध्यक्ष आरती हुल्ले ही तरुणी कोरोनाविरोधातील लढ्यात गेली चार महिन्यांपासून सक्रीय योगदान देत आहे. तिने एकाच दिवसात न घाबरता, न थकता 200 स्वॅब घेतले. तिच्या या कार्याचे कौतुक वाटते,' अशा शब्दांत आरती हुल्ले यांच्या कामाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्‌विट करत कौतुक केले आहे. 

सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसागणिक बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या विषाणूची बाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही जगभरात मोठी आहे. सरकार आपल्या पद्धतीने कोरोनापासून जनतेला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोविड सेंटर आणि तातडीने कोरोनाच्या तपासण्या करत मृत्यूदर रोखण्याचा प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील पोलिस आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ याबाबत प्रयत्नांची पराकष्ठा करत सरकारला मदत करीत आहेत. 

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही या कोरोना महामारीविरोधातील लढाईत पोलिस, डॉक्‍टर आणि नर्स हे प्रसंगी आपला जीव धोक्‍यात घालून काम करत आहेत. त्यांच्या या कामाबद्दल सरकार आणि समाजाच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. या लढाईत राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आपल्या परीने योगदान देत आहेत. 

सोलापुरातही सध्या कोरोना वाढत आहे. त्यात ग्रामीण भागात रुग्णांची लक्षणीय वाढ दिसत आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15 हजार 765 एवढी झाली आहे. आतापर्यंत एकूण 665 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सुरुवातीच्या काळात अत्यवस्थ रुग्णांना बेड उपलब्ध होऊ शकले नव्हते. खासगी रुग्णालयाकडून सहकार्य मिळत नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून हतबलता व्यक्त करण्यात आली होती. पण, त्यानंतर प्रशासनाला इतरांचेही सहकार्य मिळत गेले. 

महापालिकेत सहायक वैद्यकीय अधिकारी असलेल्या आरती हुल्ले ह्या गेली चार महिन्यांपासून कोविडविरोधातील लढ्यात आपले योगदान देत आहेत. त्यांनी एका दिवसात न थकता तब्बल 200 जणांचे स्वॅब घेतले आहेत. हुले या राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष म्हणूनही काम करतात. त्यांच्या या कामाची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्‌विट करत त्यांचे कौतुक केले आहे. 

सुळे यांच्या ट्विटला आरती यांनी रिप्लाय दिला आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, "धन्यवाद ताई, तुम्ही आम्हाला सतत मोलाचे मार्गदर्शन करत असता, त्यातूनच आम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळते.' 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com