126 गावकारभाऱ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार 

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधीत 126 उमेदवारांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
126 Gram Panchayat members in Bhor did not submit details of expenditure to the Election Commission
126 Gram Panchayat members in Bhor did not submit details of expenditure to the Election Commission

भोर (जि. पुणे) : जानेवारी महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या 126 उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे अद्याप सादर केलेला नाही. सुमारे अडीच महिन्यानंतरही खर्चाचा तपशील न देणाऱ्या या गावकारभाऱ्यांवर आयोगाकडून काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

भोर तालुक्‍यातील 156 ग्रामपंचायतींपैकी 73 ग्रामपंचायतींमधील 665 जागांकरिता जानेवारी महिन्यात निवडणुका झाल्या. निकालानंतर संबंधित उमेदवाराने एक महिन्याचा आत निवडणुकीच्या खर्चाचा तपशील द्यावा लागतो. परंतु निवडणुकीत विजयी झालेल्या 24 ग्रामपंचायतींमधील 126 ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे सादर केलेला नाही.

खर्चाचा तपशील देण्याची अंतीम तारीख 18 फेब्रुवारी होती, त्यामुळे निवडणुकीच्या खर्चाचा तपशील न दिलेल्या उमेदवारांची यादी तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधीत 126 उमेदवारांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नियमानुसार कारवाई झाल्यास संबंधित उमेदवाराला पुढील सहा वर्षे निवडणुकीला उभे राहता येणार नाही. 

निवडणूक आयोगास खर्चाचा तपशील सादर न केलेले ग्रामपंचायत सदस्य 

वेनवडी (3) - सदाशिव शिंदे, तेजश्री शिंदे, स्वाती चव्हाण. वर्वे बुद्रूक (8)- परशुराम सुतार, सविता काळाणे, सुनीता शिर्के, रामचंद्र चव्हाण, प्रकाश मोरे, राजेश कासारे, सुनील महांगरे, स्नेहा माने. वर्वे खुर्द (5)- प्रियांका भोरडे, सूरज भोरडे, धनश्री भोरडे, सोनाली भोरडे, दत्तात्रेय सपकाळ. पोंबर्डी (3)- शंकर खोपडे, सोनाली खोपडे, निलेशा खोपडे. न्हावी 15 (2)- ज्योती शिंदे, प्रियांका जगताप. न्हावी-322 (1)- जयमाला थोरात. 

हातवे बुद्रूक (6)- जयश्री साळेकर, राजेंद्र थिटे, वसंत गायकवाड, रामदास थिटे, रेश्‍मा भिलारे, पूजा भिलारे. हातवे खुर्द (3)- नितीन बरकडे, छाया खुटवड, शारदा खुटवड. नऱ्हे (3)- विलास गोळे, मीनाबाई सावंत, रेणुका सुतार. संगमनेर (5)- संजय गोरड, प्रल्हाद रायरीकर, अक्षय पवार, रमेश बांदल, कल्याणी रायरीकर. बालवडी (7)- लक्ष्मण किंद्रे, सुप्रिया किंद्रे, माधुरी भोसले, रवींद्र किंद्रे, राणी गायकवाड, सुभाष किंद्रे, रुपाली शिंदे. 

दिवळे (7)- आकाश जगताप, अमोल पांगारे, दत्तात्रेय पांगारे, विकास पांगारे, दत्तात्रेय पांगारे, विलास पांगारे, वैजयंती पांगारे. शिवरे (4)- अशोक बुचडे, सूरज शेंडकर, शोभना गायकवाड, कल्याणी डिंबळे. नसरापूर (5)- सुमन घाटे, सागर राशिनकर, अर्चना वाघमारे, प्रतिभा तनपुरे, गौरव बागमार. गोरड म्हसवली (2)- किरण ओंबळे, संजना गोरड. बारे बुद्रूक (7)- मोहन दानवले, प्रज्ञा दानवले, वैशाली दानवले, पूजा तुंगतर, दशरथ दानवले, शंकर दानवले, सरीता दानवले. 

वेळू (3) - ज्ञानेश्वर वाडकर, निलीमा गिरीगोसावी, कुंदा शिंदे. कामथडी (4) - रामचंद्र वाल्हेकर, सतीश वाल्हेकर, सुशांत इंगुळकर, छाया इंगुळकर. उंबरे (5) - अनिल ननावरे, मनीषा खुटवड, शलानी खुटवड, नवनाथ खुटवड, लिलाबाई खुडे. खोपी (1) शीतल माने. 

निगडे (3)- अलका मालुसरे, प्रतिक्षा चिकणे, प्रशांत मालुसरे. कांजळे (4)- अनुराधा जाधव, नवनाथ जाधव, विजया कामठे, मोहिनी कांबळे. मोहरी खुर्द (2)- ज्ञानेश्वर पांगारकर, कांचन पांगारकर. नाझरे (3)- अंकुश वाघे, शालन खोपडे, गणेश खोपडे. 

देगाव (5)- रत्नाबाई यादव, निखील जगताप, मंगल रांजणे, विठ्ठल पवार. बाजारवाडी (1)- नीलेश शिंदे. खानापूर (1)- स्वाती गुरव.  जोगवडी (2)- मंगल धुमाळ, राजेंद्र धायरकर. माजगाव (4)- श्रीधर शिंदे, रुपाली पडवळ, सुनीता मालुसरे, आनंदीबाई मालुसरे.

केळवडे (3)- स्नेहल कोंडे, राहुल पवार, आशिकी पवार. पाले (1)- संगीता देशमाने. भोंगवली (1)- पूनम सुर्वे. राजापूर (1)- मोनिबा बोबडे. तांभाड (1)- अंजली मादगुडे. नायगाव (1)- सारंगा शेलार. रांजे (3)- माया तावडे, शुभम तावरे, जयश्री कोंडे.  कापूरव्होळ (1)- गुलाबराव गाडे. पेंजळवाडी (5)- विशाल शिवणकर, सुनीता चव्हाण, गजानन चव्हाण, प्रियांका गायकवाड, शरद चव्हाण. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com