संग्राम देशमुखांच्या विजयाची जबाबदारी आमची : भेगडे 

पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.
We are responsible for the victory of Sangram Deshmukh
We are responsible for the victory of Sangram Deshmukh

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुखांना जिल्ह्यातून मताधिक्‍य देऊन विजय मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे. ती जबाबदारी आम्ही यशस्वीपणे पार पाडणार आहोत, असा विश्‍वास भाजपचे नेते पुणे पदवीधर मतदारसंघाचे पुणे जिल्हा नोंदणी प्रमुख रवींद्र भेगडे यांनी व्यक्त केला आहे. 

या मतदारसंघाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या उपस्थितीत वडगाव (ता. मावळ, जि. पुणे) येथे पार पडलेल्या प्रचार मेळाव्यात भेगडे बोलत होते. 

पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यात मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. मतदारांना भारतीय जनता पक्षाची भूमिका पटवून देण्यात आम्ही नक्कीच यशस्वी झालो आहे. मतदार नोंदणीसाठी आपण आघाडीवर होतो, तसे मताधिक्‍यासाठीसुद्धा पुणे आघाडीवर असेल, त्यासाठी जीव तोडून मेहनत करू आणि विजय खेचून आणू, असेही भेगडे यांनी या वेळी सांगितले. 

आम्ही विविध ठिकाणी स्वतः पोचून मतदारांशी संवाद साधला आहे. पंचवीस मतदारांमागे एक कार्यकर्ता, असे नियोजन झाले आहे. अधिकाधिक मतदान घडवून आणण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. याच कामाच्या जोरावर पदवीधर मतदार भारतीय जनता पक्षाच्या मागे उभा राहून संग्राम देशमुखांना मताधिक्‍याने विजयी करणार, हा विश्वास असल्याचे देखील भेगडे म्हणाले. 

या प्रसंगी माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेशतात्या भेगडे, तालुका प्रभारी भास्करअप्पा म्हाळसकर, जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, अविनाश बवरे, मावळ पंचायत समितीचे सभापती निकीताताई घुटकुले, महिला आघाडीच्या अध्यक्ष सायली बोत्रे, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com