...तोपर्यंत गुंजवणीचे काम सुरू करू देणार नाही : शिवसेना नेत्याचा इशारा 

त्यात शिवगंगा खोऱ्याचा समावेश नसल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.
Until then, Gunjwani project will not be allowed to start: Shiv Sena leader's warning
Until then, Gunjwani project will not be allowed to start: Shiv Sena leader's warning

खेड-शिवापूर (जि. पुणे) : "जोपर्यंत गुंजवणी प्रकल्पात भोर, हवेली तालुक्‍यातील शिवगंगा खोऱ्याचा समावेश करण्यात येत नाही, तोपर्यंत या प्रकल्पाच्या कामाचा टिकाव चालू देणार नाही,' असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी दिला आहे. 

दरम्यान, गुंजवणी बंदिस्त पाइपालाइन प्रकल्प हा शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट आहे, त्यामुळे शिवसेनेच्या दुसऱ्या एका नेत्याने या प्रकल्पाबाबत अशी भूमिका घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

गुंजवणी धरण प्रकल्पातून पुरंदरला पाणी नेण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाद्वारे पुरंदरला पाणी नेत असताना शिवगंगा खोऱ्यालाही पाणी मिळाले पाहिजे, अशी सर्वपक्षीयांची मागणी आहे. त्यासाठी प्रस्तावित गुंजवणी प्रकल्पात शिवगंगा खोऱ्याचा समावेश करण्यासाठी आत्तापर्यंत अनेक बैठका झाल्या आहेत.

या बैठकांमधून त्याविषयी वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही गुंजवणी प्रकल्पात शिवगंगा खोऱ्याचा समावेश करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. 

सध्या गुंजवणी प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, त्यात शिवगंगा खोऱ्याचा समावेश नसल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे, असे कोंडे यांनी सांगितले. गुंजवणी प्रकल्पातून शिवगंगा खोऱ्याला पाणी मिळावे, यासाठी आम्ही आक्रमक होणार असून प्रसंगी मोठे आंदोलन करण्याचा इशाराही कोंडे यांनी दिला आहे. 

कोंडे म्हणाले, "गुंजवणी प्रकल्पात शिवगंगा खोरे, वाजेघर खोरे आणि वांगणी खोरे या तीनही योजना मान्य करून घेण्यात येतील, असा शब्द तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिला होता. गुंजवणी धरणातून या तीनही खोऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे. जोपर्यंत गुंजवणी प्रकल्पात या तीन खोऱ्यांचा समावेश होऊन त्या कामाची निविदा निघत नाही, तोपर्यंत आम्ही गुंजवणी प्रकल्पाचे भूमिपूजन होऊ देणार नाही.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com