शिवसेना उपतालुका प्रमुखास तृतीयपंथियांनी केली मारहाण 

मुख्यमंत्री कुणीही असू दे, तुला न्याय मिळू देणार नाही.
Shiv Sena taluka sub chief was beaten up by transgender's
Shiv Sena taluka sub chief was beaten up by transgender's

शिक्रापूर (जि. पुणे) : पुनर्वसन जमिनीच्या वादातून शिरूरचे शिवसेना उपतालुकाप्रमुख बापू लक्ष्मण मासाळकर व त्यांच्या कुटुंबीयांना अजय मासाळकर, वैभव भाऊसाहेब ढोकले, प्रजोत कैलास ढोकले व योगेश बाळू ढोकले यांच्यासह 10 ते 15 तृतीयपंथियांनी जबर मारहाण केली. हा प्रकार जातेगाव खुर्द (ता. शिरूर, जि. पुणे) येथे घडला. 

याबाबतची माहिती अशी, शिवसेनेचे शिरूर तालुका उपप्रमुख बापू मासळकर (रा. जातेगाव खुर्द, ता. शिरूर) यांचे चाकण रोडवरील हॉटेल जेसीबीने पाडले जात होते. त्या वेळी अजय मासाळकर, वैभव भाऊसाहेब ढोकले, प्रजोत कैलास ढोकले व योगेश बाळू ढोकले यांच्यासह 10 ते 15 तृतीयपंथियांनी बापू मासळकर, त्यांच्या पत्नी व दोन पुतणे यांना लोखंडी रॉड व लाकडी दांडक्‍यांनी मारहाण केली. आरडाओरड करूनही कोणीच त्यांच्या मदतीला गेले नाही. 

या प्रकरणी बापू मासळकर यांनी शिक्रापूर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार वरील चौघांसह 10 ते 15 अनोळखी तृतियपंथियांच्या विरोधात मारहाण, शिवीगाळ, दमदाटी आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

दरम्यान, तृतियपंथी हे पुण्यातून आले होते, तर इतर संशयित आरोपी करंदी व जातेगाव येथील आहेत. सर्व संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे तपास अधिकारी आदिनाथ शिंदे यांनी सांगितले. 

इशारा देऊन मारहाण 

शिवसेनेचे तालुका उपप्रमुख बापू मासळकर यांचे पुनर्वसन जमिनीच्या ताब्यासंदर्भातील प्रकरण आहे. मासळकर यांना कुणीच दाद देत नाही. हे प्रकरण मंत्रालयाशी संबंधित असणारा एजंट हाताळत असून "मुख्यमंत्री कुणीही असू दे, तुला न्याय मिळू देणार नाही,' असा खासगीत इशारा देऊन मासळकर यांना मारहाण करण्यात आल्याचे एका शिवसैनिकाने सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com