पुण्यात फक्त सोमवारीच होते कोरोना रुग्णांची संख्या कमी!

काल सलग पाचव्या दिवशी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या १९ हजार ८६५ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.काल (रविवारी) हाच आकडा २० हजार ५१२ एवढा होता. याशिवाय १५ हजार ६२ जण घरातच उपचार घेत आहेत.
Corona Numbers Declining on Monday in Pune District
Corona Numbers Declining on Monday in Pune District

पुणे  : रविवार हा सुट्टीचा दिवस आहे. परिणामी रविवारी अन्य दिवसांच्या तुलनेत कमी कर्मचारी कामावर असतात. त्यामुळे रविवारी खुपच कमी रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने घेण्यात येत असतात. रविवारी घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल सोमवारी प्राप्त होतो. म्हणूनच फक्त  सोमवारच्या अहवालातच रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते, असे आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता तीन लाखांच्या जवळ पोचली आहे. जिल्ह्यात काल केवळ १ हजार २४० नवे रुग्ण सापडले आहेत. पुणे जिल्ह्यात सलग पाचव्या सोमवारी नव्या रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते आहे.

काल सलग पाचव्या दिवशी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या १९ हजार ८६५ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.काल (रविवारी) हाच आकडा २० हजार ५१२ एवढा होता. याशिवाय १५ हजार ६२  जण घरातच उपचार घेत आहेत.

कालच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील केवळ ३९१ जण आहेत. आज पिंपरी चिंचवडमध्ये ४४३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २८७, नगरपालिका क्षेत्रात ७५ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या  क्षेत्रात ४४ नवे रुग्ण सापडले आहेत.

दरम्यान, काल दिवसभरात २ हजार ८०४  कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ९१७ जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील ८३३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ८१०, नगरपालिका क्षेत्रातील २२९ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील १५ रुग्ण आहेत.

गेल्या २४ तासांत ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील सर्वाधिक ३१ जण आहेत.पिंपरी-चिंचवडमधील १३ आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. आज नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एकही  रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही परवा (ता.४) रात्री ९ वाजल्यापासून काल (ता.५) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

काल अखेरपर्यंत जिल्ह्यात ६ हजार ८६७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये शहरातील सर्वाधिक 3 हजार ८२७, पिंपरी चिंचवडमधील १
हजार ३७४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १  हजार ९५, नगरपालिका क्षेत्रातील ३९३ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 178 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील २९७  जण आहेत.

संस्थानिहाय टेस्ट व रुग्णांची संख्या
संस्थेचे नाव एकूण टेस्ट नवे रुग्ण 
पुणे महापालिका १ हजार ८३९ ३९१
पिंपरी-चिंचवड पालिका ३ हजार ४६१ ४४३
जिल्हा परिषद ८६१ २८७
नगरपालिका (१४) २०३ ७५
कॅंटोन्मेंट बोर्ड (३) १२४ ४४

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com