लॉकडाउनमध्ये भटकंती करणारे जानकर आईला सहा महिन्यांनी भेटले 

महादेव जानकर गेली 27 वर्षे घरी गेलेले नाहीत. त्यांची आई त्यांच्या बहिणीच्या घरी वीरकरवाडी (ता. माण, जि. सातारा) येथे आहेत. त्यांना भेटायला महादेव जानकर गेले होते.
 Mahadev Jankar met his mother after six months
Mahadev Jankar met his mother after six months

पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर सहा महिन्यांनी त्यांच्या आईला भेटले. सहा महिन्यांनी मायलेकरांची गळाभेट झाली. या वेळी आईने त्यांच्या गालावर हात फिरवत,"बाळा कसा आहेस?' अशा शब्दांत त्यांची चौकशी केली. 

महादेव जानकर गेली 27 वर्षे घरी गेलेले नाहीत. त्यांची आई त्यांच्या बहिणीच्या घरी वीरकरवाडी (ता. माण, जि. सातारा) येथे आहेत. त्यांना भेटायला महादेव जानकर गेले होते. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले. त्यानंतर जानकर यांनी सुरुवातीला राहाता तालुक्‍यात मुक्काम केला. त्यांनंतर ते बीड जिल्ह्यातील गुत्तेगाव या ठिकाणी गेले. तेथे राहून त्यांनी वाघमोडे कुटुंबाला शेतीच्या कामात मदत केली. ते दररोज शेतात जात होते. वाघमोडे कुटुंबातील लोकांच्या सोबत वैरण काढणे, औत चालवणे अशी शेतातील कामे त्यांनी केली आहेत. 

याचकाळात त्यांनी रामायण आणि महाभारत या ग्रंथांचे वाचन केले. तसेच, योगाचाही अभ्यास केला. याच दरम्यान त्यांनी तिथल्या आश्रमावर जाऊन प्रवचने ऐकल्याचे त्यांनी सांगितले. 

"गेली 27 वर्षे मी राजकारणात सक्रिय आहे. या काळात मला कसलीही विश्रांती मिळाली नव्हती. तसेच, ग्रामीण जीवनापासून थोडा दूर गेलो होतो. राजकारणासारख्या क्षेत्रात काम करत असताना मानसिक स्वास्थ राखणे आवश्‍यक असते. या चार महिन्यांत मला अनेक नव्या गोष्टी शिकता आल्या. तसेच, ग्रामीण भागातील प्रश्न नव्याने समजून घेता आले. ग्रामीण भागात राहण्याचा एक अनुभव आला' असे महादेव जानकर म्हणाले. 

"गेली सहा महिने आईची भेट झाली नव्हती. सहा महिन्यांनंतर आईला भेटलो आहे. आईला मला बघून आनंद झाला. आई हे माझे दैवत आहे आणि माझा आदर्शही तीच आहे. लॉकडाउन संपल्यानंतर आईला मुंबईला घेऊन जाणार आहे,' असेही माजी मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. 

हेही वाचा : पवारांविरोधात लोकसभा लढलेले जाचक राष्ट्रवादीच्या गोटात 

बारामती : राज्य सहकारी संघाचे माजी अध्यक्ष आणि सहकारातील दिग्गज पृथ्वीराज जाचक हे काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यापासून दुरावले होते. पण, तेच जाचक आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाचक यांनी पवारांसमवेत दुपारचे जेवण घेतले. गेल्या काही महिन्यांपासून जाचक यांना पवारांसोबत आणण्यासाठी प्रयत्न करणारे बारामतीचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी चालवलेली मोहीम अखेर सोमवारी (ता. 3 ऑगस्ट) दुपारी यशस्वी झाली आणि जाचक यांनी अजित पवार यांच्यासमवेत काम करण्याचे जाहीर केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com