हिंजवडीचे सरपंचपद खुले; कासार आंबोली, मुलखेड, आंदगावला लॉटरी 

बावधन, सूस व म्हाळुंगे ही तीन गावे पुणे महापालिकेत गेली असूनही तांत्रिक कारणास्तव त्यांचाही समावेश या सोडतीमध्ये करण्यात आला होता.
Hinjewadi Sarpanch post open; Kasar Amboli, Mulkhed, Andgaon's Lottery
Hinjewadi Sarpanch post open; Kasar Amboli, Mulkhed, Andgaon's Lottery

पिरंगुट (जि. पुणे) : मुळशी तालुक्‍यातील पंच्च्याण्णव ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण आज नव्याने जाहीर करण्यात आले. कासार आंबोली (ता. मुळशी) येथील राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या सभागृहात तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोडत घेण्यात आली. शिवण्या जाधव या साडेचार वर्षीय मुलीच्या हस्ते विविध आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. 

मुळशीच्या पूर्व पट्ट्यातील लवळे, हिंजवडी , कासारआंबोली, मुलखेड आदी गावांचे सरपंचपद खुल्या वर्गासाठी राहिल्याने तेथील चुरस वाढणार आहे, तसेच घोडेबाजारही रंगण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी 8 तारखेला जाहीर केलेले आरक्षण ग्रामविकास मंत्रालयाने रद्द केल्याने आज नव्याने आरक्षणाची सोडत काढण्यात आली. 

अनुसुचित जाती व जमाती या दोन वर्गातील आरक्षण वगळून आज ओबीसी, ओबीसी महिला, सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला या चार प्रकारच्या आरक्षणाची सोडत झाली. सुरवातीला तालुक्‍यातील 26 ग्रामपंचायतीतील सरपंचपदासाठी ओबीसी आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. त्यानंतर ओबीसी महिला, सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला या क्रमाने सोडत काढण्यात आली. 

बावधन, सूस व म्हाळुंगे ही तीन गावे पुणे महानगरपालिकेत गेली असूनही तांत्रिक कारणास्तव त्यांचाही समावेश या सोडतीमध्ये करण्यात आला होता. या वेळी अपेक्षित आरक्षणांची चिठ्ठी निघताच प्रबळ दावेदार व त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. मात्र, अपेक्षाभंग झालेल्या उमेदवारांनी व समर्थकांनी सोडत चालू असतानाच सभागृह सोडणे पसंत केले. 

कासार आंबोली, मुलखेड व आंदगावचे आरक्षण गेल्या आठ तारखेला काढलेल्या सोडतीत ओबीसीसाठी निघालेले होते. या वेळी ते सर्वसाधारण झाल्याने चुरस आणखी वाढली आहे. भरे व भूगावला मागीलवेळी सर्वसाधारण होते, ते यावेळी ओबीसीसाठी राखीव झाले आहे. 

मुळशीतील ग्रामपंचायतनिहाय आरक्षण 

सर्वसाधारण : मुळशी खुर्द, पौड, वारक, रावडे, हिंजवडी, शेरे, मुठा, कुळे, माले, वाळेण, खेचरे, लवळे, वांद्रे, आंदेशे, चिखलगाव, बार्पे, आंदगाव, वडगाव, कासार आंबोली, पोमगाव, जामगाव, भोईणी, वांजळे, नाणेगाव, टेमघर, भोडे व मुलखेड. 

सर्वसाधारण महिला : खांबोली, धामण ओहोळ, दासवे, माळेगाव, वेगरे, चिंचवड, आडमाळ, मारणेवाडी, मांदेडे, नांदगाव, हाडशी, आंबेगाव, खारावडे, भुकुम, आसदे, बेलावडे, वळणे, बोतरवाडी, नांदे, खुबवली, कोंढावळे, आंबवणे, अकोले, मोसे खुर्द, शेडाणी, अंबडवेट व जवळ. 

नागरिकांचा मागास प्रवर्ग : जातेडे, भालगुडी, रिहे, मारुंजी, सुस, बावधन , नेरे, चाले, कातरखडक, कोंढुर, भरे, पाथरशेत व भुगाव. 

नागारिकांचा मागास प्रवर्ग महिला : म्हाळुंगे, मुगावडे, कोळवण, घोटावडे, डावजे, तव, निवे, पिंपळोली, माण, दारवली, साठेसाई, लवार्डे व मुगाव. 

अनुसुचित जाती : चांदे, काशिग, भादस, उरवडे व दखणे. 

अनुसुचित जाती महिला : भांबर्डे, घुटके, आडगाव, तैलबैल, एकोले, वातुंडे, जांबे, चांदिवली, कासारसाई व पिरंगुट. 
अनुसुचित जमाती : कुंभेरी व संभवे. 
अनुसुचित जमाती महिला : कोळावडे व ताम्हिणी. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com