कोणाला चिमटे घेऊ नका, आता कामाला लागा : रमेश थोरात - Former MLA Ramesh Thorat felicitates Gram Panchayat members | Politics Marathi News - Sarkarnama

कोणाला चिमटे घेऊ नका, आता कामाला लागा : रमेश थोरात

अमर परदेशी 
बुधवार, 20 जानेवारी 2021

वरवंड ग्रामपंचायतीमध्ये ७० टक्के महिलांनी बाजी मारली.

वरवंड (जि. पुणे) : ‘‘निवडून येईपर्यंत राजकारण ठीक आहे, त्यानंतर कोणाला चिमटे घेवू नका. सर्वांना बरोबर घेवून काम करा. ग्रामस्थांनी तुमच्यावर जबाबदारी दिली आहे. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे प्रमाणिकपणे काम करा’’ असा सल्ला पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांनी दिला.

दौंड तालुक्यातील वरवंड ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती मीना धायगुडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, राष्ट्रवादीचे युवा नेते गणेश थोरात, माजी सरपंच सुनील फरगडे, गोरख दिवेकर, अंकुश दिवेकर, राहुल दिवेकर, राजेंद्र दिवेकर, किसन दिवेकर, मनोज सातपुते आदी उपस्थित होते.
      
सत्कार समारंभ कार्यक्रमापूर्वी ग्रामपंचायतीच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी महादेव मंदीरात जाऊन दर्शन घेतले. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या हस्ते प्रज्ञा दिवेकर, मारुती फरगडे, बाळासाहेब जगताप, योगीता दिवेकर, फरजाना शेख, मीनाक्षी दिवेकर, कांतीलाल टेंगले, प्रदीप दिवेकर, अर्चना रणधीर, मीरा दिवेकर, मीना दिवेकर, संगीता सातपुते या ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान करण्यात आला.

थोरात म्हणाले, ‘‘नवनिर्वाचित सदस्यांनी गावाच्या विकासावर भर द्यावा. कोणीही कामे घेवून या, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी महिलांना ५० टक्के आरक्षण दिले. मात्र, वरवंड ग्रामपंचायतीमध्ये ७० टक्के महिलांनी बाजी मारली. सतरापैकी एकुण अकरा महिला सदस्या झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये महिलाराज पाहावयास मिळत आहे.’’

राहुल दिवेकर म्हणाले, ‘‘माजी सरपंच रामदास दिवेकर यांनी गावात विकास कामांची सुरु केलेली गंगा कधी थांबू देणार नाही. गावच्या विकासावरच भर दिला जाईल. गावातील पाणी, वीज, रस्ता आदी मुलभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.’’
  
या वेळी गोरख दिवेकर, केशव दिवेकर, सुनील फरगडे, युनुस खान, मनोज सातपुते यांनी मनोगत व्यक्त केले. भालचंद्र शितोळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रस्ताविक राहुल दिवेकर यांनी केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख