भाजपचे माजी मंत्री म्हणतात, 'असं बोलणं बरं नव्हं' 

"राजकारणात टीका चुकीच्या धोरणांवर व्हावी; मात्र व्यक्तीगत पातळीवर टीका करणे बरे नव्हे,' अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.
Former BJP minister says, 'It's not good to say that'
Former BJP minister says, 'It's not good to say that'

पुणे : "राजकारणात टीका चुकीच्या धोरणांवर व्हावी; मात्र व्यक्तीगत पातळीवर टीका करणे बरे नव्हे,' अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

"आता काही निवडणुका नाहीत आणि निवडणुका असतानाही अशा शब्दांत बोलणे चुकीचे आहे,' असे देशमुख म्हणाले. "ज्या गोष्टी पटत नाहीत त्यावर टीका झालीच पाहिजे; पण टीका व्यक्तिगत नसावी. चुकीच्या ध्येयधोरणावर असावी,' असे देशमुख यांनी म्हटले आहे. 

सुभाष देशमुख यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून पवार यांना आव्हान दिले होते. पवार यांच्यावर पडळकर यांनी केलेल्या टीकेला त्यांनी "हे बोलणे बरे नव्हे,' अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. 

"राजकारणात सगळ्याच गोष्टी पटत नसतात. ज्या गोष्टी पटत नाहीत. त्यावर टीका केली पाहिजे. पण टीका पटत नसलेल्या बाबींबर करावी. कोणत्या व्यक्तीवर व्यक्तिगत टिका करू नये,' असे देशमुख म्हणाले. 

"आता कोणत्याही निवडणुका नाहीत. निवडणुकीच्या प्रचार काळात टीका होत असते. तो काळ टीका करण्याचाच असतो, पण तेव्हाही व्यक्तीगत टीका करू नये,' असे आवाहन देशमुख यांनी केले. 

फडणवीस-पाटील हेच पडळकरांचा बोलविते धनी... 
 
कोल्हापूर : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील हेच आमदार गोपिचंद पडळकर यांचे बोलविते धनी आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्यांना आता आम्ही अशा शिव्या देऊ की लाईकी नसणाऱ्या पडळकर यांना आता झोप लागणार नाही, अशा इशारा देत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. 

मुश्रीफ यांनी पडळकर यांना इशारा देताना एकेरी (अरे-तुरे) नावाचा उल्लेख करतच टिका केली. शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, गोपिचंद पडळकर यांनी पवार यांच्याबाबत वक्तव्य केले त्याचा निषेध आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे गोपिचंद पडळकरांचे बोलवते धनी आहेत.

फडणवीस यांच्या पुणे दौऱ्यामध्ये आपल्या प्रकट मुलाखतीमध्ये असाच संदर्भ दिला. त्याच्याच दुसऱ्या दिवशी पडळकर यांनी पवार यांच्याविरूध्द अपशब्द वापरणे हे निंदनीय आहे.

सोलापूर मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात पवार यांच्यावर केलेले विधान चुकीचे आणि पण पडळकर भावनेच्या भारात बोलल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात पडळकर यांने जे विधान केलेले आहे ते त्यांच्या काही तरी अनुभवावरुन केले असावे, असे सांगतात. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com