हवेलीच्या तत्कालिन भूमि अभिलेख उपअधिक्षक गौड निलंबित - Revenue Officer in Pune Suspended | Politics Marathi News - Sarkarnama

हवेलीच्या तत्कालिन भूमि अभिलेख उपअधिक्षक गौड निलंबित

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

भूमि अभिलेक विभागाच्या हवेलीच्या तत्कालिन उपअधिक्षक स्मिता गौड यांना निलंबित करण्यात आले आहे. बिनशेतीचा नकाशा तयार करताना गैरप्रकार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे तसेच ४ लाख ६५ हजार ७४० रूपये धनादेशाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर दबाव आणून काढल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

पुणे : भूमी अभिलेक विभागाच्या हवेलीच्या तत्कालिन उपअधिक्षक स्मिता गौड यांना निलंबित करण्यात आले आहे. बिनशेतीचा नकाशा तयार करताना गैरप्रकार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच ४ लाख ६५ हजार ७४० रूपये धनादेशाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर दबाव आणून काढल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

सेवाकाल खंडीत झाल्यानंतरही त्या सेवेत स्वत:हून गैरहजर राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश  काढण्यात आले. जमाबंदी आयुक्त व भूम अभिलेख संचालक एस. चोक्कलिंगम यांनी गौड यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. गौड या हवेलीच्या उप अधिक्षक असताना बिनशेती जमीनीचा नकाशा तयार करताना गैरप्रकार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तळा जिल्हा रायगड येथे उप अधिक्षकपदावर त्यांची 10 ऑगस्टला 2020 रोजी बदली करण्यात आली. मात्र, ११ ऑगस्ट ते १४ सप्टेबर या काळात त्या बदलीच्या ठिकाणी कामावर हजर राहिल्या नाहीत. त्यानंतरही आठ नोव्हेबरपर्यंत त्या स्वेच्छा गैरहजर राहिल्या आहेत.

या संपूर्ण प्रकरणात त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवेली तालुका हा पुणे शहर आणि उपगरात मोडतो. शेती तसेच बिनशेतीच्या शेकडो जागा या तालुक्‍यात आहेत. मालमत्तांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असा हा तालुका आहे. त्यामुळे या तालुक्‍यात काम करताना आधिकाऱ्यांना अधिक काळजीपूर्वक काम करावे लागते. या पार्श्‍वभूमीवर गौड यांच्याबाबत आलेल्या तक्रारी तसेच त्यांनी कर्मचाऱ्यांवर दबाव आणून काढलेली रक्कम हा सर्वच प्रकार सरकारी आधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पातळीवर चर्चेचा विषय आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख