वाढदिवसानिमित्त आजोबांना रोहित पवारांची विनंती...आपल्या अनुभवाची शिदोरी तरूणाईला हवीय..

तुमच्याबद्दल नेहमीच एक आदरयुक्त भीती वाटत असल्याने माझ्या भावना पूर्णपणे व खुलेपणाने व्यक्त करता येणार नाहीत, म्हणून मी हे पत्र लिहितोय
3rohit_pawar_sharad_pawar_696x364.jpg
3rohit_pawar_sharad_pawar_696x364.jpg

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस...यानिमित्ताने विविध क्षेत्रातील व्यक्ती व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनीही त्यांना पत्र लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आठवणींना उजाळा दिला आहे. 

रोहित पवार यांनी हे पत्र आज सकाळी मुंबई येथे शरद पवार यांना दिलं. या पत्रात ते म्हणतात की तुमच्याबद्दल नेहमीच एक आदरयुक्त भीती वाटत असल्याने माझ्या भावना पूर्णपणे व खुलेपणाने व्यक्त करता येणार नाहीत, म्हणून मी हे पत्र लिहितोय,' असं रोहित पवार यांनी पत्रात म्हटलं आहे. या पत्रात रोहित पवार यांनी त्यांच्याकडे एक विनंतीही केली आहे. 

आपल्या पत्रात रोहित पवार म्हणतात....
"आदरणीय साहेब तुम्हाला काय भेट द्यावी, असा खूप विचार केला. पण काही सुचत नव्हतं. तुमची वाचनाची आवड पाहून एखादं पुस्तक भेट देण्याचा विचार केला, पण तुमचा व्यासंग पाहता ते तुम्ही आधीच वाचलेले असेल, अशी मला खात्री आहे, आणि तुम्ही स्वतः एक चालताबोलता संदर्भग्रंथ आहात, म्हणून पुस्तकाचा विचार मागे पडला आणि यंदाच्या दिवाळीत तुम्ही तुमच्या आईला म्हणजेच माझ्या पणजीला (कै. शारदाबाई पवार) यांना लिहिलेले पत्र अचानक आठवलं. यातून तुमच्या जडणघडणीत आईवडिलांचे जे स्थान आहे, याबाबतच्या हृद्य भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. खरं तर तुमच्या बाबतीत माझ्या मनात तशाच भावना आहेत. या भावना मांडाव्यात असा विचार मनात आला आणि तुमच्याबद्दल नेहमीच एक आदरयुक्त भीती वाटत असल्याने माझ्या भावना पूर्णपणे व खुलेपणाने व्यक्त करता येणार नाहीत, म्हणून मी हे पत्र लिहितोय..."

"तुमच्याकडं दांडगा अनुभव आहे. मी माझ्या कामानिमित्त बऱ्याचदा तरुणांना भेटत असतो, त्यामुळं त्यांच्या अपेक्षा मला माहित आहेत. आपल्या दांडग्या अनुभवाची शिदोरी आज या तरूण वर्गाला शिकण्यासाठी हवीय. मग ती लेखाच्या अथवा पुस्तकाच्या माध्यमातून असो किंवा तरुणांसोबत संवाद साधण्याच्या एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असो, आपण ती द्यावी, अशी या तरुण वर्गाचा एक प्रतिनिधी म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे."
 
(Edited  by : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com