आपण माजी झाला आहात, याचे भान ठेवा : सुनील शेळकेंचा बाळा भेगडेंना चिमटा

असे अनेक सचिन वाझे मावळातील शासकीय कार्यालयांत आहेत.
You have become a former MLA, keep this in mind : Sunil Shelke's criticism of Bala Bhegade
You have become a former MLA, keep this in mind : Sunil Shelke's criticism of Bala Bhegade

मावळ :  आमदारांच्या आशीर्वादाने मावळ तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयांत भ्रष्टाचार सुरू आहे. आमदारांचे कार्यकर्ते तेथे उभे असतात. असे अनेक सचिन वाझे मावळातील शासकीय कार्यालयांत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर केला होता. त्याबाबत भेगडे यांच्यावर टीका करत ‘आपण माजी झाला आहात, याचे भान ठेवा’ असा चिमटा शेळके यांनी माजी आमदार भेगडे यांना काढला आहे. (You have become a former MLA, keep this in mind : Sunil Shelke's criticism of Bala Bhegade)

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार शेळके बोलत होते. कोरोनाच्या संकटात काम केलेल्या पत्रकार, डॉक्‍टर, आरोग्य सेविका, परिचारिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, मदतनीस, स्वच्छता कर्मचारी आदींचा कोरोना योध्दा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पार्थ फाउंडेशनच्या वतीने लोणावळ्यातील जनतेसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे या वेळी लोकार्पण करण्यात आले. राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे यांनी 51 हजार रुपयांचा धनादेश या वेळी पक्षाला दिला. 

‘‘कोरोना काळात आई-वडिलांचे छत्र हरपल्यामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष करेल, अशी घोषणा आमदार सुनील शेळके यांनी केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे व पक्षाची ध्येयधोरणे तसेच विकासकामे घराघरांत पोचवावीत,’’ असे आवाहनही त्यांनी केले. 

आमदार शेळके म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस हा केवळ पक्ष नसून तो एक परिवार आहे. दीड वर्षात पक्षाने तालुक्‍यात दोन जिल्हा उपजिल्हा रुग्णालये, अनेक पूल, ग्रामीण व जिल्हा मार्ग रस्ते, प्रशासकीय इमारतीसाठी निधी, रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत. 

मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे  म्हणाले की, मावळ तालुक्‍याने शरद पवार साहेबांच्या भुमिकेचे नेहमीच स्वागत केले आहे. मग ती भुमिका समाजवादी कॉंग्रेसची असो की राष्ट्रवादी कॉंग्रेसची. साहेबांनी महिला, शेतकरी, सहकारी संस्था यांना नेहमीच पाठबळ दिले. त्यामुळे राज्यात सहकाराला बळकटी आली आहे. 

मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबूराव वायकर, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, दीपक हुलावळे, पुणे जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, महिलाध्यक्षा सुवर्णा राऊत, युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, कैलास गायकवाड, संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष नारायण ठाकर, सुनील भोंगाडे, ऍड. रुपाली दाभाडे, वैशाली दाभाडे, अंकुश आंबेकर, सुनील ढोरे, अतुल राऊत, आफताब सय्यद, भाऊसाहेब ढोरे आदी उपस्थित होते. सुभाष जाधव यांनी प्रास्ताविक केले. अतुल राऊत यांनी सूत्रसंचालन केले. सुनील दाभाडे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com