राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी पंपावर मांडली चूल 

केंद्र सरकारच्या गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात राज्यातील महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
Women activists of NCP agitate against petrol and diesel .jpg
Women activists of NCP agitate against petrol and diesel .jpg

पिंपरी : मोदीजींची खरी बात गरिबांच्या पोटावर लाथ, सर्वसामान्यांचा एकच नारा, महागाई थोडीतरी कमी करा, मोदी सरकार हाय हाय अशा घोषणांद्वारे इंधन दरवाढीचा निषेध करीत, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आज पेट्रोल पंपावरच चूल मांडून आंदोलन केले. 

केंद्र सरकारच्या गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधातील आजच्या राज्यातील महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाची सुरुवात पिंपरी चिंचवडमधून प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात झाली. ज्या पेट्रोलपंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिराती आहेत, तेथे हे "चुल मांडा" आंदोलन करून इंधन. दरवाढीचा निषेध नोंदवला गेला. या महिन्यात तिसऱ्यांदा एकूण शंभर रुपयांची झालेली गॅस दरवाढ सर्वसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारी असून याव्दारे केंद्र सरकार दिवसाढवळ्या जनतेच्या पैशावर "दरोडा "घालत आहे, असे चाकणकर म्हणाल्या. 

या वेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल काळभोर, नगरसेविका संगिता ताम्हाणे, नगरसेविका सुलक्षणा धर, कविता आल्हाट, संगिता आहेर, मनिषा गटकळ आदी या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

हे ही वाचा...

सांगलीचे राष्ट्रवादीचे महापौर पवारांच्या भेटीला : 'करेक्‍ट कार्यक्रमा'ची घेतली माहिती 
 
सांगली : "शहर विकासाकडे लक्ष द्या... झटून कामाला लागा,' असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सांगलीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नूतन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना आज (ता. 27 फेब्रुवारी) दिला. सांगली महापालिकेतील घडामोडींची पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेत त्यांनी तेथील राजकारण जाणून घेतले. 

महापौर सूर्यवंशी यांनी आज बारामतीत गोविंदबाग येथे पवार यांची भेट घेतली. या वेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राष्ट्रवादी युवकचे राहुल पवार, अल्पसंख्याक सेलचे आयुब बारगीर उपस्थित होते. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी सर्व सार्वजनिक कार्यक्रम त्यांनी रद्द केले असून सध्या ते बारामतीत आहेत. सांगली महापालिकेतील विजयानंतर सूर्यवंशी यांनी पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज (ता. 27 फेब्रुवारी) सकाळी बारामती गाठली. या वेळी पवार यांनी सुमारे वीस मिनिटे त्यांच्याशी चर्चा केली. शहराच्या विविध विकास कामांबद्दल माहिती जाणून घेतली. तुमचे नियोजन काय? अशी विचारणाही केली. शेवटी झटून काम करा, असा सल्ला दिला. 

सांगली महापालिकेत तिसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादीने थेट महापौरपदावर उडी घेत भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा पराभव केला होता. उपमहापौर निवडणुकीतही 39 विरुध्द 36 मतांनीच या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेश पाटील यांनीही भाजपचे उमेदवार गजानन मगदुम यांचा पराभव केला आहे. या कार्यक्रमाची इत्यंभूत माहिती शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी दिली. 

शरद पवार यांनी किती सदस्य अनुपस्थित राहिले आणि किती सदस्यांनी विरोधी मतदान केले, हे जाणून घेतानाच फुटीर सदस्य यापुढे आपल्यासोबत राहणार का? असा सवाल केला. त्यावर बजाज यांनी फुटीर सदस्य पूर्वी आपल्याकडेच होते. ते फुटून तिकडे गेले, असा खुलासा केला. पवार यांनी "फुटलेल्या सदस्यांना ताकद द्या, त्यांची कामे करा,' असा सल्लाही दिला. 

Edited By - Amol Jaybhaye  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com