पिंपरीतील पोलिसाच्या त्या लेटरबॉम्बला वाचा फुटणार का? 

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या अधिकाऱ्यांना महिना शंभर कोटी रुपयांचा हफ्ता गोळा करण्यास सांगितल्याचा लेटरबॉम्ब मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी नुकताच टाकला.
पिंपरीतील पोलिसाच्या त्या लेटरबॉम्बला वाचा फुटणार का? 
Will action be taken on Pimpri police letter .jpg

पिंपरी : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या अधिकाऱ्यांना महिना शंभर कोटी रुपयांचा हफ्ता गोळा करण्यास सांगितल्याचा लेटरबॉम्ब मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी नुकताच टाकला. त्याचे पडसाद सध्या राज्यात उमटत आहेत. तसाच लेटरबॉम्ब, पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्यावर्षी पडला होता. फक्त तो पोलिस आयुक्तांविरुद्ध एका पोलिसाचा असल्याने तो फुटलाच नाही. त्याची चौकशी अद्याप सुरु असून कारवाई शून्य आहे.

नवी मुंबईचे पोलिस आयुक्त होण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी पैशाचे मोठे डिल केल्याचा ठपका राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) त्यावेळच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अहवालात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते बिष्णोई व पिंपरीचे पहिले पोलिस आयुक्त के. पद्मनाभन यांच्या कार्यकाळात चार कोटी रुपये महिना हफ्ता कसा गोळा केला जात होता, तो कोण व कसा गोळा करीत होते, मीडियाला मॅनेज करण्यासाठी कुठल्या तीन पत्रकारांना महिन्याला वीस हजार रुपये पाकिट दिले जात होते. याची इत्यंभूत माहिती गतवर्षीच्या पिंपरीतील लेटरबॉम्बमध्ये आहे.

२०२० व २०२१ च्या या दोन्ही लेटरबॉम्बमध्ये अनेक साम्ये तथा विचित्र योगायोग आहेत. आताचा लेटरबॉम्ब हा मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी टाकला आहे, तर गेल्यावर्षाचा पिंपरीतील तत्कालीन पोलिस आयुक्तांवरच टाकण्यात आला होता. मुंबईच्या लेटरबॉम्बची चौकशी आता निवृत्त न्यायाधीशाची समिती करणार आहे. तर, पिंपरीची ही चौकशी सीआयडी करीत आहे. २०११ चा हा पत्रहल्ला गृहमंत्र्यावर असून २०२० चा आयुक्तांवर होता. दोन्हींकडे गुन्हे शाखा तथा क्राईम ब्रॅंच मध्यवर्ती स्थानी आहे. 

मुंबईत गुन्हे शाखेचे एपीआय सचिन वाझे रडारवरच नाही, तर आता ते त्यात पूर्ण पणे गुंतल्याचे दिसत आहे. तर, पिंपरीत गुन्हे शाखेच्याच खंडणी व दरोडा प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर हफ्तेखोरीचा आरोप आहे. मात्र, त्यांचे निव्वळ बदलीवर निभावले आहे. मुंबईत वाझेची बदलीच झाली नाही, तर संपूर्ण गुन्हे शाखेतच पूर्ण खांदेपालट केला गेला. पिंपरीत फक्त एका अधिकाऱ्याच्या बदलीवरच निभावून नेण्यात आले. 

दोन्ही पत्रे मुख्यमंत्र्यानांच लिहिलेली आहेत. एक (मुंबईचे) पद्धतशीरपणे मीडियापर्यंत पोचवण्यात आले, तर दुसरे पिंपरीचे मात्र, पद्धतशीरपणे दडपण्यात आले. दोन्ही ठिकाणी पदांचा गैरवापर हफ्तेवसुलीसाठी करण्यात आल्याचा आरोप होत आहे. दोन्हीत आयपीएस अधिकारी आहेत. मात्र, बळी फक्त पोलिसांचाच गेला आहे. मुंबईच्या प्रकरणात एपीआय जेलमध्ये गेला, तर पिंपरीत मात्र पीआयचे बदलीवरच निभावले. मुंबईच्या पोलिस आयुक्तांचा लेटरबॉम्ब इंग्रजीत, तर पिंपरीतील ते पत्र पोलिसाचे असल्याने ते मराठीत होते. 

 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in