पाच कर्तृत्ववान आमदार लाभलेले कोल्हे सर्वात सुखी खासदार : सुळे 

मतदारसंघात कर्तृत्वान आमदार (शेळके) निवडून आला. त्यामुळे त्यांना इथे (मावळ विधानसभा मतदारसंघात) काही कामच राहिलेलं नाही. पाच वर्षे नाही आले नाही, तरी चालतंय.
who has five capable MLAs Dr.  Amol Kolhe is the happiest MP: Sule
who has five capable MLAs Dr. Amol Kolhe is the happiest MP: Sule

पिंपरी : मतदारसंघात कुठलंही लग्न, दहावा न चुकविणाऱ्या आमदारांचे टाईम मॅनेजमेंट भारीच असतं, असं कौतुक खासदार सुप्रिया सुळे यांनी तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथे केले. एकाचवेळी मतदारसंघ आणि मुंबईत त्यांचा लीलया वावर हा जुळे भाऊ वा डुप्लीकेट असल्यासारखा असतो. असे कार्यक्षम, कर्तृत्ववान आमदार लाभलेले खासदार भाग्यवान म्हणायला हवेत. याबाबत पाच आमदार (मतदारसंघात) लाभलेले शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे सर्वात सुखी आहेत, त्यांना काही कामच ठेवले नाही, अशी कोपरखळी सुळेंनी मारताच मोठा हास्यस्फोट झाला. 

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार मेळाव्यात सुळे बोलत होत्या. हलक्‍याफुलक्‍या शैलीतील भाषणात त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. पक्षाचे स्थानिक आमदार (मावळ) सुनील शेळके यांच्या वर्षभरातील कामगिरीचे कौतुक करताना खरंच तुमची ही पहिलीच टर्म आहे का? असा चौकार त्यांनी मारला. 

शेळके व संजय जगताप यांच्यासारखे आमदार एकाच वेळी मतदारसंघात व मुंबईतही दिसतात. कसं जमतं, त्यांना हे माहित नाही. कुणाचं लग्न, दहावाही ते चुकवित नाहीत. ते घरी जातात की नाही, हे त्यांच्या घरच्यांनाच विचारले पाहिजे? डुप्लीकेट वा जुळ्यांप्रमाणे त्यांचे काम सुरु असतं, असं त्यांनी विनोदाने सांगितले. 

हाच टोन पुढे कायम ठेवत त्या म्हणाल्या की, श्रीरंगअप्पांचे भाग्य खूप चांगले, त्यांच्या मतदारसंघात असा कर्तृत्वान आमदार (शेळके) निवडून आला. त्यामुळे त्यांना इथे (मावळ विधानसभा मतदारसंघात) काही कामच राहिलेलं नाही. पाच वर्षे नाही आले नाही, तरी चालतंय. पुन्हा फॉर्म भरायला आणि सर्टिफिकेट घ्यायलाच जायचं. आमदारांनी नारळ फोडायला बोलावलं, तर जायचं नाही, तर दुरुनच शुभेच्छा द्यायच्या. 

याबाबत मतदारसंघात पाच आमदार असलेले डॉ. कोल्हे सगळ्यात सुखी आहेत. आमदारांचे महत्व काय असते, हे तीन टर्म खासदार असल्याने पूर्ण माहीत आहे, असे सुळे म्हणाल्या. वर्षभरात पाचशे कोटी रुपयांचा निधी आणला. या शेळके यांच्या भाषणातील वाक्‍याचा धागा पकडून त्यांनी कोटी केली. या पैशाशी माझा काही संबंध नाही. माझ्या खिशातून ते दिलेले नाहीत, महाविकास आघाडी सरकारने ते दिलेले आहेत. शेळकेंचे भाषण काल्पनिक समजू या. नाहीतर, परत गेल्यावर माझ्या कानामागे पुरंदरचा भुंगा लागेल, असे त्या म्हणाल्या आणि हा मेळावा सुरु असलेल्या या मंगल कार्यालयात पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com